
हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…
सातारा : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला शनिवारी (ता. १९) सायंकाळी भीषण अपघात झाला होता. या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले होते. यामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र वैभव भोईटे हे हुतात्मा झाले आहेत. जवान वैभव भोईटे अनंतात विलीन झाले असून, दीड वर्षाच्या लेकीने त्यांना अग्नी दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
लडाखमध्ये हुतात्मा झालेल्यांमध्ये एक ज्यूनिअर कमीशन्ड ऑफिसर आणि ८ जवानांचा समावेश आहे. लेहहून न्योमाच्या दिशेने जाताना लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. लडाखच्या न्योमा जिल्ह्यातल्या कियारी येथे लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले होते. यावेळी झालेल्या अपघातात ९ जण हुतात्मा झाले. लेहजवळील कारू चौकीतून लष्कराचा ताफा जात असताना ही घटना घडली. लडाखमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची नावे पुढीलप्रमाणेः रमेश लाल, महेंद्र सिंह, विजय कुमार, एन चंद्र शेखर, तेजपाल, मन मोहन, अंकित, तरनदीप सिंह आणि वैभव भोईटे अशी आहेत.
फलटण तालुक्यातील राजाळे येथील जवान वैभव संपत भोईटे हे वाहन अपघातात हुतात्मा झाले आहेत. वैभव यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, लहान भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. वैभव यांना वीरमरण आल्याच्या बातमीने राजाळे गावावर शोककळा पसरली आहे. वैभव यांचा मृतदेह गावी आल्यानंतर वभाव भोईटे अमर रहेच्या घोषणा दिल्या. यावेळी परिसर दुमदुमून गेला होता.
जवान वैभव भोईटे यांच्यावर राजाळे गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दीड वर्षाच्या चिमुकलीने अग्नी दिला. यावेळी कुटुंबियांसह अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
GOC #FireandFuryCorps & All Ranks salute the Bravehearts who made supreme sacrifice, in the line of duty in #Ladakh on 19 Aug 23 and offer deep condolences to the bereaved families in this hour of grief@adgpi@NorthernComd_IA pic.twitter.com/Gobt1CVWwH
— @firefurycorps_IA (@firefurycorps) August 20, 2023
लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; पाहा नऊ जणांची नावे…
कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…
Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…