जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…
नांदेड: भारतीय लष्करात असलेल्या जवानाने गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कंधार तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. हत्येनंतर आरोपी पती एकनाथ जायभाये हा स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपी एकनाथ जायभाये हा सैन्यदलात आहे. राजस्थान मधील बिकानेरमध्ये सध्या तो नियुक्त आहे. आज (बुधवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास पत्नी भाग्यश्री (वय २३) आणि चार वर्षांची मुलगी सरस्वती दोघे झोपेत असताना त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. पत्नी भाग्यश्री ही आठ महिन्यांची गरोदर होती. हत्येनंतर आरोपी एकनाथ जायभाये हा स्वतः माळाकोळी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीने या घटनेची माहिती दिल्यावर पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलिस स्टेशनमध्ये गर्दी केली होती.
भाग्यश्री जायभाये यांचा विवाह 2019 साली एकनाथ जायभाये यांचा सोबत झाला होता. त्यानंतर त्याला एक मुलगी झाली. पत्नीचा तो छळ करत होता, अशी तक्रार भाग्यश्रीच्या आईने केली असल्याचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान, मयत विवाहितेच्या माहेरच्यांनी आरोपी हा माहेरावरून प्लॉट घेण्यासाठी पैसे आणण्यासाठी तगादा लावत होता, असा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…
कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…
जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…
महाराष्ट्राचा सुपुत्र आकाश अढागळे लेहमध्ये हुतात्मा…