पोलिस झाले हायटेक! आरोपींच्या शरीरावर बसवले जीपीएस; पळाला तरी…
श्रीनगरः आरोपी तुरुंगातून सुटताना त्याच्या पायाच्या घोट्यात जीपीएस यंत्रणा बसण्याचा निर्णय जम्मू-काश्मिर पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे आरोपीच्या सर्व हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष रहाणार आहे. असे तंत्रज्ञान वापरणारे जम्मू-कश्मीर देशातील पहिले राज्य ठरले आहे.
आरोपी जामीन किंवा पॅरोलवर असताना फरार होण्याची चिंता राहणार नाही. अतिरेकी कारवायात सामील असलेल्या आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खास योजना आखली आहे. आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रीका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशा प्रकारे जीपीएस डीव्हाईस शरीरात बसविण्यात येत होते. या देशात जामीन, पॅरोल आणि घरात नजरकैदेत केलेल्या आरोपीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा वापरली जात असते. तसेच तुरुंगात जामीनाअभावी सजा भोगत असलेल्या कच्च्या कैद्यांची संख्या वाढत असल्याने त्यांना ठेवण्याची जागा नसल्याने गर्दी कमी करण्यासाठी देखील हा उपाय केला जातो.
जम्मू-काश्मीर राज्यातील तपास संस्थांनी आता या उपायाचा आपल्याकडे वापर करण्यास सुरुवात केली आहे. अतिरेक्यांवर पाळत ठेवण्यासाठी या जीपीएस ट्रॅकर एंकल ब्रेसलेट ( Gps Ankle Bracelet) वापर केला जात आहे. आरोपीच्या पायात पैंजणाप्रमाणे त्याच्या घोट्याला हे एंकलेट घातले जाणार आहे. जेलमधून आरोपीला पॅरोलवर रजा मिळताच किंवा रितसर जामीन मिळताच हा जीपीएस बॅंड त्याच्या घोट्याला लावला जाईल. त्यामुळे त्याच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवणे पोलिसांना सोपे जाणार आहे.
यूएपीएच्या विविध कलमांतर्गत एफआयआर झालेल्या आरोपी गुलाम भट याने जामीनासाठी अर्ज केला होता. जामीनावरील सुनावली लांबल्याने त्याने अंतरिम जामीन मिळावा असा अर्ज केला होता. जम्मू-कश्मीरच्या एनआयच्या विशेष कोर्टाने आदेश दिल्यानंतर अतिरेकी कारवायात सामील असलेल्या या आरोपीला हे जीपीएस उपकरण लावण्याचा आदेश दिला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी आणि श्वान हुतात्मा…
जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…
भारतात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकमध्ये बनली मंत्री…
कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!