Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…

मुंबई: एका जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली आणि प्रवाशाचा जीव वाचवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून जवानावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत.

व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते की, एक रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली असून, प्लॅटफॉर्म वरून एक आरपीएफ जवान चालताना दिसत आहे. त्याचवेळी एक प्रवासी रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. मोटर मन ने रेल्वे ट्रॅकवरील त्या प्रवाशाला पाहिले आणि ट्रेनचा हॉर्न वाजवला. आरपीएफ जवानाचे लक्ष ट्रेन आणि त्या प्रवाशाकडे गेले आणि क्षणाचाही विलंब न करता प्रवाशाला वाचवायला गेला. त्यावेळी रेल्वे अगदी जवळ होती. आरपीएफ जवानाने त्या प्रवाशाला वाचण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आणि प्रवाशाला सुखरूप बाहेर काढले. आरपीएफ जवानाच्या तत्परतेमुळे तो व्यक्ती थोडक्यात बचावला. काही सेकंदही उशीर झाला असता तर त्या दोघांनाही रेल्वेची धडक बसली असती.

भारतीय रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ कर्मचारी जबाबदार असतात आणि अपघात टाळण्यासाठी ते अनेकदा स्वत:ला धोक्यात घालतात. ते भारतीय रेल्वे व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांच्या कामाची खूप प्रशंसा केली जाते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अनेक लोक आरपीएफ जवानाच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. आयपीएस ऑफिसर डॉ. के. व्यंकेटशम यांनी आपल्या @Venkatesham_IPS या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!