युवकाची विवाहापूर्वी गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोराने ठेवले स्टेटस…

छत्रपती संभाजीनगर: पैशांच्या किरकोळ वादातून युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लग्न अवघ्या ११ दिवसांवर असलेल्या अल कुतूब हसीब हमद (वय ३०) याचा खून करण्यात आला आहे. ७ हजार ५०० रुपयांच्या व्यवहारातून झाली हत्या झाल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अल कुतूब हमद हा हुसेन कॉलनीत आईसोबत राहत होता. पैठणगेटच्या एका कपड्याच्या दुकानात तो काम करत होता. बुधवारी (ता. ९) सायंकाळी साडे सातच्या सुमारास न्यू बायजीपुऱ्यातील इंदिरानगरमध्ये त्याच्यावर गोळीबार झाला. हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर पुन्हा मृत झालेल्या हमदला लाथाबुक्क्याही मारल्या. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हल्लेखोराचे नाव फयाज पटेल असल्याची माहिती पुढे आली आहे.

अल कुतूब हमद याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर हल्लेखोराने स्टेटसही ठेवले होते. ‘तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आयेगा’ असे स्टेटस त्याने ठेवले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…

प्रेम प्रकरणातून नदीत उडी मारलेल्या युवकाचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह…

प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने मुलीने केली वडिलांना बेदम मारहाण…

नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…

धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!