‘हश टॅग कॅफे, हुक्का पार्लरवर’ पोलिसांचा छापा अन् पुढे…

गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उप विभागीय पोलिस अधिकारी, सुनील ताजने यांचे मार्गदर्शनाखाली अवैधरित्या चालणाऱ्या ‘हश टॅग कॅफे, हुक्का पार्लरवर’ रामनगर पोलिसांची छापा टाकला. घटनास्थळावरून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस ठाणे रामनगरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना गोपनीय बातमीदार कडून माहिती मिळाली की, कॅफेच्या नावाखाली रेलटोली परिसरात हश टॅग कॅफे, येथे अवैधरित्या हुक्का पार्लर चालविण्यात येत असून तरुण युवकांना नशेच्या आहारी करण्यात येत आहे. मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारावरून पो. स्टाफ सह, हश टॅग कॅफे, रेलटोली, गोंदिया येथील हुक्का पार्लरवर दिनांक 12/08/2023 रोजी रात्रौ 22.30 ते 23.40 वा दरम्यान छापा कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी

1) रिचर्ड प्रदीप फ्रान्सिस वय 28 वर्ष रा. बिरजू चौक, रामनगर, गोंदिया (विना परवाना अवैधपणे तंबाखूजण्य पदार्थाचा हुक्का पार्लर चालविणारा)
2) आदर्श अनिल विश्वकर्मा वय 22 वर्ष रा. सुबोध चौक, गणेशनगर, गोंदिया
3) फिलिप बब्बु संतियागो वय 21 वर्ष रा. पाटणकर चौक, जरीपटका, नागपूर यांना सेवणाकरिता सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने दिला. त्याप्रमाणे नमूद आरोपी यांच्या ताब्यात खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे.
1) AL AYAAN ZAFFRAN PAN असे लिहिलेले बॉक्स 2 नग प्रत्येकी 120 रू. असे एकूण कि. 240 रू.
2) afzal कंपनीचा MINT फ्लेवर असे लिहिलेला बॉक्स 4 नग प्रत्येकी किं. 100 रू. असे एकूण कि. 400 रू.
3) MARHABA कंपनीचा MEHFIL (QIWAM) फ्लेवर असे लिहिलेला बॉक्स 4 नग प्रत्येकी कि. 95 रू. एकूण कि. 380 रू.
4) Aladdin कंपनीचा Brain FREEZER फ्लेवर असे लिहिलेला बॉक्स 4 नग प्रत्येकी कि. 150 रू एकूण कि. 600 रू.
5) एक काचेचा हुक्का पॉट पाईप सह कि. अंदाजे 500 रू.
6) इतर 4 काचेचा हुक्का पॉट कि. अंदाजे 500 रू.
7) 260 रू. काऊंटर मधील भारतीय चलनातील रोख रक्कम असा एकूण कि. 4,380 रू. चा माल मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे.

नमूद तिन्ही आरोपी यांचेविरूद्ध पोलिस ठाणे रामनगर येथे (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य आणि वितरण नियमन) कायदा 2003 चे कलम 4 व सदर कायद्याचे संदर्भात महाराष्ट्र शासन 2018 चा अधिनियम क्रमांक 60 अन्वये कलम 4(अ), 21(अ) चे उल्लंघन केले असल्याने पो हवा. सुनील चव्हाण यांचे लेखी खबरेवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नी. राजू बस्तवाडे पो.स्टे. रामनगर करीत आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे निर्देश व आदेशाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्त्वात सपोनी राजू बस्तवाडे, पो.उप. नी. सुशील सोनवणे, पो. हवा. सुनीलसिंह चौव्हान, पोहवा जावेद पठाण, माने, पोना. दारासिंग पटेल, राहुल वणवे यांनी केली आहे.

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या २४ जनावरांची केली सुटका…

पुण्यात स्फोट करण्याचा कट; तिसऱ्या आरोपीला गोंदियातून अटक…

बकऱ्यांची चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!