धक्कादायक! सोलापूरमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या…

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे एका महिला डॉक्टरने गळफास घेवून जगाचा निरोप घेतला आहे. डॉ. रश्मी संतोष बिराजदार असे मृत डॉक्टरचे नाव आहे. डॉ. रश्मी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मोहोळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील मोहोळ मल्टी स्पेशालिटी हे तीन मजली हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर डॉ. रश्मी बिराजदार या पती आणि दोन मुलांसमवेत राहात होत्या. सकाळी नेहमीप्रमाणे पती संतोष बिराजदार हे स्वतःच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुपारी त्यांना काम करणाऱ्या व्यक्तीने फोन करून ही घटना कळवली.

घटनेची माहिती होताच संतोष बिराजदार यांनी घराकडे धाव घेतली. डॉ. रश्मी बिराजदार यांना बेशुद्धावस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…

पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….

नवविवाहीत डॉक्टर युवतीने घेतला जगाचा निरोप; सुसाइट नोट मध्ये म्हटले की…

शंकास्पद! कोलकता येथील ट्रेनी डॉक्टरच्या शरीरात 150mg वीर्य…

महिला डॉक्टरने घेतला जगाचा निरोप; कारण अस्पष्ट…

डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!