
हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…
भोपळ (मध्य प्रदेश): एका डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून टोकाचे पाऊल उचलले आहे. मंदसौरमध्ये फिजिओथेरपिस्ट असलेल्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर सुसाइड नोट पोस्ट करून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाय, प्रियकराचे फोटोदेखील अपलोड केले. डॉ. आशू मेघवाल असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी युवतीने आठ पानी सुसाइड नोट लिहिली. त्यात प्रियकराने धोका दिल्याने कसं दुःख झालं याविषयी लिहिले आहे. तसेच तिने मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर चार पोस्ट केल्या. एका पोस्टमध्ये प्रियकरासोबतचे फोटो अपलोड केले. तिने सुसाइड नोटमध्ये लिहिले की, ‘या मूर्ख जगाचा आणि लोकांचा मी निरोप घेत आहे. प्रिय मी तुझा निरोप घेते. माझा प्राण मी तुला अर्पण करते. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असे मी म्हटले होते. शेवटी तू मला मारून टाकलं.’
डॉ. आशू मेघवाल हिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांसह युवतीचा मृतदेह हायवेवर ठेवून चक्काजाम आंदोलन केले. कुटुंबीयांनी युवतीच्या आत्महत्येसाठी तिच्या प्रियकराला जबाबदार धरले असून त्याला तातडीने अटक करावी आणि त्याचे घर बुलडोझरने पाडून टाकावे अशी मागणी केली आहे. पिपलिया मंडी पोलिस स्टेशनचे प्रभारी कपिल सौराष्ट्रीय यांनी सांगितले, ‘युवतीच्या सुसाइड नोटच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. युवतीचा प्रियकर जितेंद्र नागदा हा मंदसौरमध्ये लॉ प्रॅक्टिस करतो. चार-पाच महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होतं. तपासात त्याचे वडील दोषी आढळले तर त्यांच्यावरदेखील कारवाई होईल.’
मृत युवतीने नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला होता. ती सध्या फिजिओथेरपीचा कोर्स करत होती. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका पोस्टमध्ये वडिलांच्या नावे दोन पानी पत्र लिहून माफी मागितली. दुसऱ्या पोस्टमध्ये जितेंद्र नागदावर प्रेमात फसवणूक केल्याचा आरोप लावला तर तिसऱ्या पोस्टमध्ये युवकासोबत असलेले दहा फोटो अपलोड केले आहेत. युवतीच्या कुटुंबीयांनी सांगितलं, की हे दोघं बऱ्याच दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पाच महिन्यांपूर्वी युवकाने दुसऱ्या युवतीशी विवाह केला. विवाहानंतर हे दोघं वेगळे झाले. काही दिवसांनी प्रियकर जितेंद्र पुन्हा आशूला भेटला. कुटुंबीयांच्या समाधानासाठी मी लग्न केलं आहे; पण मी पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करीन,’ असे त्याने तिला सांगितलं. गेल्या सोमवारी दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत दोघं एकत्र होते; पण रात्री जितेंद्रचा धाकटा भाऊ आला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. तुमची मुलगी माझ्या भावाची फसवणूक करत आहे, असे तो म्हणाला. त्यानंतर जितेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांचे मृत युवतीच्या कुटुंबीयांशी वाद होऊ लागले. या दरम्यान युवतीच्या प्रियकराने पुन्हा लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे युवतीने टोकाचं पाऊल उचलले आहे.
प्रियकरासोबत बायको पळाली; दुसरी आणल्यावर पहिली आली माघारी अन्…
प्रियकराबाबत प्रेयसी रडू-रडू पोलिसांना सांगू लागली अन्…
प्रेयसीच्या गालावर गरम लोखंडी रॉडने लिहिलं स्वतःचं नाव…
नवरा प्रेयसीसोबत तर पत्नी प्रियकरासोबत गेली पळून; तीन चिमुकल्या रडत आहेत…
प्रेयसीला जंगलात भेटायला बोलावलं अन् खेळ खल्लास केला…
प्रेमप्रकरण! बिझनेस मिटींगसांगून प्रेयसीसोबत राहू लागला अन् पुढे…

