
शंकास्पद! कोलकता येथील ट्रेनी डॉक्टरच्या शरीरात 150mg वीर्य…
कोलकाता : कोलकाता आरजी कर मेडिकल कॉलेजच्या ट्रेनी डॉक्टरवर (वय ३१) बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. तिच्यावर बलात्कार नव्हे तर सामूहिक बलात्कार झाल्याची शंका व्यक्त केली जाते आहे.
पीडितेच्या कुटुंबियांनी न्यायालयात आरोप करताना म्हटले की, शवविच्छेदन अहवालात पीडितेच्या शरिरात मोठ्या प्रमाणावर वीर्य आढळून आले. यामुळे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला का? यात आणखी लोक सहभागी होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुलीचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली आहे. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचेही समोर आले आहे शवविच्छेदन अहवालामुळे चिंता वाढली आहे.
पीडित मुलीच्या शरीरावर जखमांचे व्रण आहेत. यावरून तिच्यावर क्रूर आणि हिंसक हल्ला केल्याचे दिसत आहे. डोक्यात गंभीर जखमांचे व्रण आढळले. दोन्ही कानांवर जखमा आहेत. यामुळे तिने सुटका करून घेण्यासाठी धडपड केली असावी. तिच्या ओठांवरही जखमा आहेत. तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला असावा. हा हल्ला किती क्रूर होता हे तिच्या गळ्यावर झालेल्या दुखापतीवरून आणि कापल्याच्या व्रणावरून समजू शकते असं आई वडिलांनी याचिकेत म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे. तो एक वॉलंटियर होता आणि नेहमी रुग्णालयात जायचा. दरम्यान, संजय रॉयच्या सासूने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच्यावर पत्नीला मारहाणीचे आरोप होते. रॉयने त्याच्या आई आणि बहिणीलासुद्धा मारहाण केल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. पोलिसांनी जेव्हा संजय रॉयला अटक केली तेव्हा त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर चौकशीवेळी मला फाशी द्या, असेही तो म्हणाला.
डॉक्टर बलात्कार आणि हत्या! पोलिसांच्या तीक्ष्ण नजर अन् आरोपीचे फुटलं बिंग…
पाप करणाऱ्यांना फाशी, भीती निर्माण करणे गरजेचे: नरेंद्र मोदी
धक्कादायक! पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा गेला जीव…
अजब घटना! पती नोकरीनिमित्त बाहेरगावी अन् पत्नीने केला १२ वेळा गर्भपात…
Video: मामीने पळून जात बांधली भाचीशी लग्नगाठ; 3 वर्षांपासून रोमान्स…

