धक्कादायक! डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग…

जळगाव: एक महिला पोट दुखत असल्याने उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली होती. मात्र, उपचारासाठी आलेल्या या महिलेचा डॉक्टरने विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना अमळनेर येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा डॉक्टर अनिल शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेचे पोट दुखत असल्याने महिलेने धुळे येथील एका रुग्णालयात तपासणी केली. यावेळी अपेंडिक्स असल्याचे निदान करण्यात आले. त्यामुळे याबाबत उपचारासाठी महिला अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा हॉस्पिटलमध्ये गेली होती. पीडित महिला तपासणी करण्यासाठी आली असता तपासणी करण्याच्या बहाण्याने डॉक्टर अनिल शिंदे यांनी विनयभंग केला आहे, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

पोलीस तक्रारीत महिलेनं आपला विनयभंग झाला असल्याचे सांगितले आहे. महिलेच्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसात रात्री उशिराने डॉक्टर अमोल शिंदे यांच्या विरोधात विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…

पुणे महानगरपालिकेजवळ महिलेचा विनयभंग करणारा ताब्यात…

पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजाला अटक…

लॉजवर मैत्रिणीसोबत असताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने युवकाचा मृत्यू…

खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा तासाभरातच मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!