Video: सर्कसमधील अपघात पाहून पोटात येईल गोळा…

बीजिंग (चीन) : एका सर्कसमधील अपघातात तिघे कलाकार जखमी झाले असून, संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चिलीचे ट्रॅपीझ कलाकार जॉर्ज अलारकॉन यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना सुमारे आठ दिवस रुग्णालयात घालवावे लागले.

सर्कसमधील एका शोदरम्यान एका कलाकाराने दोरी पकडण्यात यश मिळवले. मात्र, इतर दोन कलाकार खाली पडले, त्यात जॉर्ज थेट जमिनीवरच पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या गुडघ्याला दुखापत होण्याबरोबरच त्याच्या डोक्यालाही तीन टाके पडले आहेत. जॉर्जला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.

जॉर्ज म्हणाला, ‘रुग्णालयात आठ दिवस राहिल्यानंतर डॉक्टरांनी मला तीन आठवड्यांच्या विश्रांतीसाठी घरी पाठवले. चीनमधील डॉक्टरांनी मला सांगितले की तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मी बरा होईन, परंतु सर्कसच्या मॅनेजमेंटने यासाठी कोणताही खर्च दिला नाही.’

दरम्यान, सर्कस व्यवस्थापनाने जॉर्जला फक्त दोन आठवड्यांच्या कामाचे पैसे देऊन त्याच्या मायदेशी चिली येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. सर्कसमधील त्याच्या सहकाऱ्यांनी पुढे येऊन त्याच्या विमानाच्या तिकिटाची व्यवस्था केली. पण, मायदेशी परतल्यावर, चिलीतील डॉक्टरांनी जॉर्जला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.

Video:सीमाने सचिनमध्ये असं काय पाहिलं?

Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…

Video: पाकिस्तानमधील गरिबी; गाढवाला काय करावं लागतंय पाहा…

Video: जिगरबाज युवती चोरावर अक्षरशः तुटूनच पडली…

Video: चिमुकलीच्या अंगावरून तीन वाहनं गेली अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!