प्रियकराला घरी बोलावून प्रायव्हेट पार्टवर केले ब्लेडने वार…
रांची (झारखंड): प्रियकराला शारीरिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.
झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, सदर महिला विवाहीत असून, नवऱ्यापासून वेगळी राहात आहे. वर्षभरापूर्वी तिची गावातील सुशील टुडू याच्याशी ओळख झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. सुशीलने लग्नाचे वचन देऊन आपल्यासोबत अनेक वेळा शरीरसंबंध ठेवले, मात्र लग्नासाठी दबाव टाकल्यावर त्याने नकार दिला, असा आरोप त्या महिलेने केला. यामुळे संतापलेल्या महिलेने सुशील याला धडा शिकवण्याचे ठरवले आणि शरीरसंबंध ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर थेट वार केला.
या घटनेनंतर आरोपी महिलेने स्वत: गिरिडीहमधील तारातंड पोलीस ठाणे गाठले आणि न्यायाची मागणी केली. दुसरीकडे या घटनेत जखमी झालेल्या पीडित युवकाच्या कुटुंबीयांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेला ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पीडित युवका विरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपी महिला आणि तिचा प्रियकर दोघेही आधीपासूनच विवाहीत आहेत. दोघांनाही मुलं आहेत. मात्र पीडित युवक हा त्याच्या पत्नीपासून लपून-छपून आरोपी महिलेला भेटायला येत असे. आरोपी महिलाही पतीपासून वेगळी रहात होती. पीडित युवकाने तिला लग्नाचे वचन दिले होते. मात्र ते पाळले नाही, म्हणूनच रागाच्या भरात तिने हे कृत्य केले. घटनेनंतर महिला स्वत: पोलीस ठाण्यात आली आणि आत्मसमर्पण केले, तिने तिच्या प्रियकराविरोधात तक्रारही दाखल केली आहे. सध्या पोलिस दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत.’
प्रियकराची वाट पाहून आलाच नाही; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म…
प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला प्रियकराला पकडले अन् विवस्त्र करून…
प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर दिला विजेचा शॉक अन्…
प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांचा चढला पारा अन्…
प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने केले नको ते कृत्य…
प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…