राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय महिला नेत्याची हत्या; सुटकेसमध्ये मृतदेह…

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय आणि ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्या नेत्या हिमानी नरवाल (वय २२, रा. विजय नगर, रोहतक, हरियाणा) यांची हत्या करण्यात आली आहे. हरियाणा काँग्रेसच्या त्या युवती नेत्या होत्या. सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर हरियाणा आणि रोहतकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

काँग्रेसच्या युवा नेत्या हिमानी या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधी यांच्या सोबतही त्या चालल्या होत्या. नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीतही त्यांनी सक्रीयपणे काम केले. भूपेंद्र सिंग हुड्डा आणि दीपेंद्र सिंग हुड्डा यांच्या निवडणूक प्रचारातही त्यांनी सहभाग नोंदवला होता.
रोहतकमधील सांपला उड्डाणपुलाजवळ एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याने जाणाऱ्यांनी सुटकेस पाहिली आणि पोलिसांना कळवले होते. सुटकेस उघडून पाहिल्यानंतर मृतदेह आढळून आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांची गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.’

दरम्यान, हिमानी या राजकीयदृष्ट्या सोशल मीडियावर खूप सक्रीय होत्या. त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता. हरियाणातील भारत जोडो यात्रेतील नियोजनामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. हरियाणा निवडणुकीत अनेक काँग्रेस नेत्यांच्या प्रचारातही त्या सक्रिय होत्या. काँग्रेसच्या विविध आमदारांनी हिमानी नरवाल यांच्या हत्येची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे काँग्रेस आमदार भारत भूषण बत्रा यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

IT मॅनेजरनं Live Video करत छळाला कंटाळून संपवलं आयुष्य…

धक्कादायक! बदला घेण्यासाठी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केली निर्घृणपणे हत्या…

तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष मोरे यांनी हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून केली आत्महत्या…

युवतीची क्रूरपणे हत्या, निर्वस्त्र, बरगड्या तुटलेल्या अन् संपूर्ण शरिरावर जखमा…

रील स्टार मुलाचा माजी सैनिक असलेल्या बापाने केला खून अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!