… तर मी कार्यक्रम करणं खरंच बंद करेन : गौतमी पाटील

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील नागापूर परिसरामध्ये नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ उडाला. हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने गौतमी पाटील हिने अर्ध्यावरच कार्यक्रम बंद केला. आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणं बंद करेन, असे गौतमी पाटील हिने म्हटले आहे.

नागापूर परिसरामध्ये गौतमी पाटील हिचा नृत्याचा मंगळवारी (ता. १) कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम सुरू असताना किरकोळ दगडफेक झाली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. यातील एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. हुल्लडबाजांनी घातलेल्या गोंधळामुळे गौतमी पाटील हिने अर्ध्यावरच आपला कार्यक्रम बंद केला. सोबतच आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणार नसल्याचेदेखील तिने सांगितले आहे.

गौतमी पाटील म्हणाली, ‘मी खूप दिवसांनी नृत्याचा कार्यक्रम करत होते. माझ्या कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात प्रेक्षक गर्दी करतात. अनेकदा समोर बसलेल्या प्रेक्षकांमुळे मागच्या प्रेक्षकांना दिसत नाही. त्यामुळे गोंधळ होत असतो. आताही तेच झालं. त्यामुळे मी लगेचच कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्येक आयोजकाला मला सांगायचे आहे की, बंदोबस्त व्यवस्थित करा. माझ्या कार्यक्रमात जर नेहमीच गोंधळ होणार असेल तर मी येथून पुढे कार्यक्रम बंद करते…आणि खरचं करेल.’

गौतमी पाटील म्हणाली, माझ्या आडनावावर कार्यक्रमावर आक्षेप असेल तर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!