डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

सोलापूर : डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगोला येथे घडली आहे. या घटनेमुळे सांगोल्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. सांगोला पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिस फरार डॉक्टराचा शोध घेत आहेत.

संशयीत आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांच्या सोबत डॉक्टर ऋचा यांचे 2012 मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन लहान मुलं आहेत. लग्नानंतर डॉक्टर सुरज हा पत्नी ऋचाला वारंवार मानसिक आणि शारिरीक त्रास देवून पैशाची मागणी करत होता. सुरज त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून शारीरिक मानसिक त्रास देत होता.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

आरोपी डॉक्टर सुरज रूपनर हा एमआरआय मशीन विकत घेण्याकरीता माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर आत्महत्या कर म्हणून सातत्याने ऋचा यांना त्रास देत होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर ऋचा रुपनर यांनी 6 जून रोजी सांगोला येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सांगोला पोलिस स्टेशनमध्ये ऋचा यांचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर डॉक्टर सुरज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपी डॉक्टर सुरज रुपनर यांचा शोध सुरु आहे. आरोपीला अटक करून कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी डॉक्टर ऋचा यांच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा…

पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध अन् आत्महत्या…

महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…

दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!