
नवविवाहीत डॉक्टर युवतीने घेतला जगाचा निरोप; सुसाइट नोट मध्ये म्हटले की…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर शहरातील बजरंग चौक परिसरात राहणाऱ्या एका विवाहित डॉक्टर युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून या पत्नीने गळफास घेतल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा प्रीतम गवारे (वय २६) असे या विवाहितेचे नाव आहे.
पती हा वारंवार चरित्रावर संशय घेत होता. शिवाय माहेरून हुंड्याचे पैसे आणि फर्निचर साठी पैसे आणण्याचा तगादा लावत होता. त्यामुळे कंटाळलेल्या या डॉक्टर पत्नीने जगाचा निरोप घेतला आहे. पतीला फोन करून प्रतीक्षाने घरी बोलावले. मात्र तो येण्यापूर्वीच तिने गळफास घेतलेला होता. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रतीक्षा मूळची कन्नड तालुक्यातली होती. एमबीबीएस झालेल्या प्रतीक्षाचा प्रीतम गवारे याच्याशी मार्च महिन्यातच विवाह झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसांनीच त्याने प्रतीक्षाला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रीतम तिच्यावर संशय घेत होता. वडिलांकडून पैसे आण, घरासाठी, फर्निचरसाठी पैसे आण अशा मागण्या करत होता. महिन्याभरापूर्वीच प्रतीक्षाला एमजीएममध्ये नोकरी लागली होती. ती प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती.
प्रतीक्षा शनिवारी दुपारी एक वाजता रुग्णालयातून घरी परतली. तेव्हा तिने पतीला मेसेज करून घरी बोलावले. मात्र पती येण्याआधीच तिने गळफास घेतला. प्रतीक्षाने गळफास घेतल्यानंतर तिचा मृतदेह पती प्रीतमने एमजीएममध्ये पोहोचवला. त्यानंतर तो पसार झाला. बजरंग चौक परिसरातील एका सोसायटीत प्रतीक्षा व प्रीतम हे १ ऑगस्टपासून घर भाडेतत्त्वावर घेऊन राहत होते. प्रतीक्षाचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तर प्रीतम अजूनही वैद्यकीय शिक्षण घेत आहे. प्रीतम प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
दरम्यान, प्रतीक्षाने तीन पानी सुसाइड नोटही लिहिली आहे. पोलिसांनी सदर चिठ्ठी जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत.
महिला डॉक्टरने घेतला जगाचा निरोप; कारण अस्पष्ट…
एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या युवतीने घेतला जगाचा निरोप…
कोल्हापुरात उच्चशिक्षित बहिण-भावाने घेतला जगाचा निरोप; हृदयद्रावक सुसाईड नोट…
हृदयद्रावक! पत्नीसोबत सेल्फी अन् घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये म्हटले…
हृदयद्रावक! उच्चशिक्षित युवकाने घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये भावनिक…
पोलिसाचे स्वप्न राहिले अधुरे; प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला अन्…

