पत्नीसाठी केले धर्मांतर अन् विवाहानंतर तिचीच केली हत्या…

ठाणे : नवऱ्याने वेगळ्या राहणाऱ्या पत्नीची हातोड्याने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, सासू आणि मुलीवरही हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मुंब्रा येथील आंबेडकर नगरमध्ये घडली आहे. जरीन अन्सारी असे मृत महिलेचे नाव आहे. तर विजय उर्फ ​​समीर कमलनाथ मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील आंबेडकर नगरमध्ये जरीन अन्सारी (वय 30) ही महिला तिची मुलगी आणि एका मुलासह सासू आणि पती विजय उर्फ ​​समीर कमलनाथ मिश्रा यांच्यासोबत राहत होती. पतीने तिच्यासाठी धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्विकारला आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्यानंतर तो भिवंडीत पत्नीपासून वेगळा राहत होता.

पत्नीला भेटायला अचानक आला आणि त्याने रागाच्या भरात पत्नी जरीनवर थेट हातोड्याने वार केला. यावेळी जरीनला वाचवण्यासाठी आलेल्या सासू आणि मोठ्या मुलीवरही विजयने हल्ला केला. या घटनेत जरीनचा मृत्यू झाला. तर त्याची सासू आणि मुलगी जखमी झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जरीनला आणि तिच्या घरच्यांना वाचवण्यासाठी आलेल्यांनाही त्याने मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली असून आता मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.

दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

माझ्या बायकोचं अफेअर आहे म्हणत केली आत्महत्या…

महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…

अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या…

सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!