महिला युवकांना फोन करून गोड-गोड बोलून हॉटेलवर बोलवायची अन्…
जयपूर (राजस्थान): एक महिला युवकांना फोन करून त्यांच्याशी गोड-गोड बोलायची. पुढे भेटण्यासाठी हॉटेलवर बोलवायची आणि नवऱ्याला बोलून युवकांचे अपहरण करून मोठी रक्कम लुटायची. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पती-पत्नीला अटक केली आहे.
अल्वर पोलिसांनी हनी ट्रॅप प्रकरणी टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी अनीता आणि तिचा वरा पुनिया राम पुनखर यांना ताब्यात घेतले आहे. अनीता ही युवकांना फोन करून त्यांच्याशी गोड बोलायची. घरी एकटी असल्याचे सांगून युवकांना हॉटेलवर भेटायला बोलवायची. हॉटेलवर गेल्यानंतर पाठीमागून नवरा आल्यानंतर युवकाचे अपहरण करायचे.
युवकाला मोटारीमधून घालून घेऊन जायचे आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करू म्हणून मोठ-मोठी रक्कम लुटायचे. ही एक टोळीच होती. अनेकांना त्यांनी अशा प्रकारे लुटले आहे. एका युवकाकडून तीन लाख रुपये लुटल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधिकारी प्रेमलता वर्मा यांनी सांगितले की, अनिता ही युवकांना फोन करून प्रेमाच्या गोष्टी करायची. घरी एकटी असल्याचे सांगून फोनवर बोलत राहायची. पुढे काही दिवस फोनवर बोलल्यानंतर हॉटेलवर भेटायला बोलवायची आणि लुटायची. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.
हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…
मॉडेलने घातला अनेक युवकांना लाखो रुपयांचा गंडा…
प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…
प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…
बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…
न्यूज ऍंकर सलमा सुल्ताना हिचा शोध घेण्यात पाच वर्षांनी पोलिसांना यश…