जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!

पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा आपलं १५ महिन्याचं बाळ आणि पत्नीसह सहकुटुंब दिल्लीतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ महिने २१ दिवस होते. भारत सरकाने त्यांची सुखरूप सुटका केली. पण, लष्करामधून नुकतेच त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सीमेवर उभे राहून देशसेवा करण्याची इच्छा असतानाही आपल्याला बडतर्फ केले आहे. शिवाय, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन पण मिळणार नसल्याने कुटुंब चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

चंदू चव्हाण यांना भारतात आणल्यानंतर पुन्हा सेवेत दाखल झाले होते. लष्कराच्या वरिष्ठांकडून सतत आरोप प्रत्यारोप करत त्याच्यावर चौकशी लावल्या गेल्या. भारतात आल्यानंतर चंदू चव्हाण ने आपल्या सैन्य दलातील वरिष्ठांकडे या संदर्भात पत्र व्यवहार देखील केला. मी चुकून पाकिस्तान मध्ये नव्हे तर रागाच्या भरात त्यांचा बदला घेण्यासाठी मी गेलो होतो असे देखील कबूल केले होते, असे चंदू चव्हाण यांनी सांगितले.

chandu-chavan-family
‘पाकिस्तानात तीन महिने २१ दिवस मरण यातना भोगल्यानंतर परत आल्यापासून भारतीय लष्कर माझ्या पतीला चुकीच्या वागणुकी देत आहे. त्यांच्यावर अनेक कारवाया करण्यात आल्या आणि आता थेट नोकरीवरून बडतर्फ करण्यात आल्याने हा आमच्यावर अन्याय आहे. भारत सरकारने याची दखल घेऊन त्यांना त्वरित कामावर पुन्हा रुजू करावे, अन्यथा माझे पती व मी आमच्या पंधरा महिन्याच्या बाळासह आत्मदहन करणार आहोत, असे चंदू चव्हाण यांच्या पत्नीने म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तान मधून परत आल्यापासून सैन्य दलामध्ये अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे आरोप करत आपण याबाबत आपण अनेकदा भारत सरकारला पत्र व्यवहार देखील केला. याकडे शासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप चंदू चव्हाण यांनी केला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी थेट चंदू चव्हाण यांना सेवेतून बडतर्फ केल्याने त्यांनी सहकुटुंब आंदोलन आणि आत्मदहनाचा पावित्र हाती घेतला आहे. यामुळे भारत सरकार त्यांच्या या मागणीची दखल घेणार का? त्यांना सेवेत पुन्हा रुजू केले जाणार का? की या जवानाला आत्मदहन करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलाव लागणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्कः
चंदू चव्हाण : 88883 60382

पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!

पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक…

जवान चंदू चव्हाण यांना धुळे महानगर पालिकेत धक्काबुक्की…

कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!