हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…

जयपूर (राजस्थान): एका महिलेने आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीला गळफास दिल्यानंतर स्वःताही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बांसवाडामध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

महिलेचा पती कामावरून घरी परतल्यानंतर घरातील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हे प्रकरण प्राथमिक दृष्ट्या आत्महत्येचं आहे असं वाटतं, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एका झोपडीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला आहे. मुलीचं नाव दिव्या आणि तिच्या आईचे नाव रमिला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर मृत्यूचं नेमके कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.’

पती दिनेश याने सांगितले की, ‘सकाळी जेवण करून कामावर गेलो होतो. दुपारी घरी आल्यानंतर समोरचं दृष्य पाहून धक्का बसला. आणखी एक नऊ वर्षांची मुलगी देखील असून, ती तिसरीमध्ये शिक्षण घेत आहे.’

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…

हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…

हृदयद्रावक! आईने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत: लाही संपवलं…

हृदयद्रावक! पोत्यात साप समजून कोणी जवळ जात नव्हते, पण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!