पुणे शहरात घडली हादरवून टाकणारी घटना; गुन्हा दाखल…

पुणे: पुणे शहरातील पर्वती परिसरात हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने केवळ अत्याचारच केला नाही, तर जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पर्वती पायथा परिसरात घडली. आरोपी धीरज लोंढे (वय ३५) याने पीडित महिला गतिमंद असल्याचे ओळखून तिला गाठले. तिला धमकावून तिच्याच घरात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला आणि याबद्दल कोणाला काही सांगितल्यास ‘तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देऊन तो पसार झाला.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या वहिनीला सांगितल्यानंतर हे भयानक वास्तव समोर आले. वहिनीने तातडीने पर्वती पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पर्वती पोलिसांनी आरोपी धीरज लोंढे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे! ‘रील स्टार’ महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल, पोलिस दलात खळबळ…

पुणे! चेंजिंग रूममध्ये CCTV कॅमेरा; महिलेचा कपडे बदलताना Video काढला अन्…

पुणे! प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने मोबाईल सुरू केला अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!