ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा इशारा; थेट लायसन्स होणार रद्द…
पुणे : पुण्यात वाहतूक पोलिसांनी ड्रिंक आणि ड्राइव्ह करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली असून, आता जर कोणी दारू पिऊन गाडी चालवताना आढळलं, तर सर्वात आधी त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यांसाठी रद्द केलं जाईल. त्यानं जर पुन्हा तीच चूक केली, तर त्याचं लायसन्स 6 महिन्यांसाठी रद्द होणार आहे.
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
मोटर वाहन कायदा कलम 19मध्ये तरतूद आहे की, जे दारू पिऊन गाडी चालवतात त्यांचे लायसन्स 3 महिन्यांसाठी रद्द करता येते. पुणे शहरात गेल्या 6 महिन्यांमध्ये 1684 जणांवर ड्रिंक अँड ड्राइव्हप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जर अल्पवयीन मुलांनी गाडी चालवली तर तो गुन्हाच आहे. अशा प्रकरणात कलम 199 अ नुसार पालक आणि गाडीच्या मालकावर गुन्हा दाखल करून 6 महिन्यांची शिक्षा आणि 25000 रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. ड्रायव्हिंग लायसन्स 12 महिन्यांसाठी रद्द होते. शिवाय ज्या मुलानं गाडी चालवली, त्याला वयाच्या 25 वर्षांपर्यंत लायसन्स मिळत नाही. तसेच जर पुन्हा असा गुन्हा घडला तर लायसन्स कायमस्वरूपी रद्द केले जाते.
दरम्यान, पुणे शहरात गेल्या 6 महिन्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेल्या 1684 जणांचे लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओला पाठवण्यात आले आहेत. यात 25 ते 40 वयोगटातील चालकांचा समावेश आहे. दरम्यान, दुचाकीवरून जाताना हेल्मेटचा सक्तीने वापर करावा, असे आदेश वाहतूक पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिले आहेत.
पुणे शहरात गाडी अडवली म्हणून दोघांची पोलिसाला जबर मारहाण…
हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…
पुणे शहरात महिला पोलिसाला जिंवत जाळण्याचा प्रयत्न; आरोपीला कोठडी अन्….
पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीने लिहिलेला निबंध आला समोर…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…