हृदयद्रावक! पोत्यात साप समजून कोणी जवळ जात नव्हते, पण…

लखनौ (उत्तर प्रदेश) : झाडाझुडुपांमध्ये एका पोत्यात एक नवजात चिमुकली दोन दिवस तळमळत होती. पोत्यात साप असल्याचा अंदाज बांधून नागरिक जवळ जात नव्हते. पण, मासेमारी करणाऱ्यांमुळे चिमुकलीचा जीव वाचला आहे. देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्येय आला आहे.

चिमुकलीला कोणीतरी पोत्यात घालून झाडाझुडुपांत फेकले होते. चिमुकली आईच्या दुधाविना दोन दिवस कळवळत होती. पोत्यातून तिचा आवाजही कोणापर्यंत पोहोचत नव्हता. शिवाय, पावसामुळे थंडीचे वातावरण होते. थंडी आणि पोटात काही नसल्यामुळे चिमुकलीची अवस्था दयनीय होत चालली होती.

गावातील माजिद नावाच्या व्यक्तीला नदीवर मासेमारी करायला जात असताना पोतं दिसले. पण, पोतं वळवळत होतं, त्यावरून त्यात नक्कीच साप असणार अशी भीती त्यांना वाटली म्हणून पोत्याजवळ न जाता ते थेट नदीवर गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मासेमारी करण्यासाठी आले असता, त्यांना त्याच ठिकाणी तेच पोतं वळवळताना दिसले. मग आपल्या साथीदारांसह हिम्मत करून ते पोत्याजवळ गेले आणि उघडून पाहिले असता आत एक तान्ह बाळ रडत होते.

माजिद यांनी तत्काळ याबाबतची माहिती गावकऱ्यांना दिली. पोलिसांना सुद्धा माहिती समजल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. चिमुकलीला स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. चिमुकलीवर उपचार केल्यानंतर ती पूर्णपणे सुखरूप आहे. दरम्यान, विषारी प्राण्यांचा वावर असलेल्या झुडुपांमध्ये ती दोन दिवस सुखरूप राहिली, हा दैवी चमत्कारच आहे, अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…

हृदयद्रावक! विश्वास नांगरे पाटील यांनी नितीन देसाईंबद्दलच्या भावनांना करून दिली मोकळी वाट…

हृदयद्रावक! गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…

हृदयद्रावक! नवदाम्पत्य बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले अन्…

हृदयद्रावक! फलटणमधील पिता-पुत्र जेवण करून झोपले अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!