Video: राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव…
पुणे : ताम्हिणी घाटात एक युवकाने धबधब्यात उडी मारली आणि वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्वप्नील धावडे असे या युवकाचे नाव असून, तो राष्ट्रीय खेळाडू होता. स्वप्निल हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला असताना घटना घडली आहे.
स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्याच आधारे ते भारतीय सैन्यात सामील झाले होते. 18 वर्षांच्या सेवेनंतर ते मागील वर्षी निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत आहेत.
Tamhni Ghat Pune Youth Drowned into Waterfall : स्टंट बेतला तरूणाच्या जीवावर! पाहा व्हिडीओ pic.twitter.com/pSsrbjNGs5
— ABP माझा (@abpmajhatv) July 1, 2024
स्वप्नील धावडे (रा. पिंपरी-चिंचवड) हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. शनिवारी हा ग्रुप ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता. ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो उंचावरून धबधब्यात उडी मारताना दिसत आहे. पौड पोलिस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग टीम लोणावळाने प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन्ही कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध घेतला. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नील आढळला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत या परिसरात शोधकार्य सुरू होते. आजही सकाळी पुन्हा या ठिकाणी शोधकार्य सुरू होते. आज मृतदेह रायगड जिल्ह्यातील मानगाव येथे आढळून आला आहे.
स्वप्नील धावडे हे जीम ट्रेनर होते. जीममधे तरुण आणि त्यांची स्वतःची मुलगी घटनास्थळी उपस्थित होती. प्लस व्हॅली मधे एकुण तीन कुंड आहेत. पहिल्या कुंडातील पाणी धबधब्यातून वाहत मधल्या कुंडात जाते आणि तिथून ते सर्वात खाली असलेल्या कुंडात जाते. स्वप्नील धावडे आणि त्यांची टीम पावसाळा सुरु होण्यापूर्वी याच कुंडांमधे पोहण्यासाठी उतरले होते. मात्र तेव्हा पाण्याला फार जोर नव्हता. शनिवारी ते आणि त्यांची टीम पुन्हा प्लस व्हॅली मधील सर्वात वरच्या कुंडाजवळ गेले. स्वप्नील धावडे यांनी त्यांच्या जीम मधील सहकाऱ्यांसमोर फेसाळत्या पाण्यात उडी मारली. सुरुवातीला त्यांनी काठावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र धबधब्याच्या टोकाला आल्यानंतर त्यांची दगडावरील पकड निसटली आणि ते धबधब्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. स्वप्नील धावडे यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर शोककळा पसरली आहे.
Video: …तर लोणावळा येथे अन्सारी कुटुंब बचावले असते
Video: लग्नसमारंभासाठी आलेले अन्सारी कुटुंब लोणावळा येथे गेले अन्…
धक्कादायक Video: लोणावळा येथील भुशी डॅमवर कुटुंब गेलं वाहून…
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय अन् नाशिकमध्ये जोरदार राडा…
माजी आमदाराला अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी…
पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…