अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला पितृशोक…

मुंबई: ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे वडील शशिकांत लोखंडे (वय ६८) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. शशिकांत लोखंडे यांच्या पार्थिवावर आज (रविवार) ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे वडिलांसोबत घट्ट नाते होते. वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती अनेकदा सोशल मीडियावर शेअर असे. फादर्स डेनिमित्त तिने वडिलांसाठी खास पोस्ट लिहिली होती. तिने लिहिले होते की, ‘माझे पहिले हिरो माझे बाबा आहेत. मला तुमच्याबद्दल वाटणाऱ्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. संघर्षापासून तुम्ही तुमच्या मुलांना दूर ठेवले आहे.’

अंकिता लोखंडे हिचे कुटुंब हे इंदूरचे आहे. तिचे वडील म्हणजेच शशिकांत लोखंडे हे बॅंकर होते. तर आई शिक्षिका होती. काही दिवसांपासून तिच्या वडिलांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, अंकिता लोखंडे हिने 2009 मध्ये एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले. या मालिकेत ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती. या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. ‘कॉमेडी सर्कस’, ‘एक थी नायका’ आणि ‘झलक दिखला जा’ अशा अनेक कार्यक्रमांत अंकिता सहभागी झाली आहे. कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. काही दिवसांपूर्वी ती विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली असून अभिनयापासून दूर आहे.

धक्कादायक शेवट! रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड…

हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…

अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!