Video: लग्नसमारंभासाठी आलेले अन्सारी कुटुंब लोणावळा येथे गेले अन्…
पुणे : लोणावळा येथील भुशी डॅम परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहे. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले आहेत.
लोणावळ्यात 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यश आले आहे. बुडालेल्या 5 जणांपैकी 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एक अद्याप बेपत्ता आहेत. उर्वरित शोधकार्य आज करण्यात येणार आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यातून हे पाच जण वाहून गेले आहेत. हे सर्वजण अन्सारी कुटुंबातले आहेत. यात लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे.
अन्सारी कुटुंब एका लग्नसमारंभासाठी लोणावळा येथे आले होते. समारंभ पार पडल्यापासून ते भुशी डॅमजवळ असलेल्या धबधब्यावर आले. साधारणतः रविवारी (ता. ३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास ते गेले होते. या ठिकाणी अचानक पाऊस वाढला. या ठिकाणी 15 मिनिटांसाठी जरी पाऊस पडला तरीदेखील धबधब्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर वाढते. या पाण्याचा या कुटुंबाला अंदाज आला नाही त्यामुळेच दुर्घटना घडली. हा धबधबा पुढे जाऊन भुशी डॅमला मिळतो.
अन्सारी कुटुंबातील सदस्याने सांगितले की, ’27 तारखेला आग्रा इथून ते एका लग्नासाठी आले होते. लग्नसोहळा पार पडला. 30 जूनला रिसेप्शन झाले आणि त्यांनी लोणावळा फिरयाचा प्लॅन केला होता, 1 जुलैला ते मुंबईला जाणार होते. सकाळी सगळे निघाले, येता येता छोट्या धबधब्यावर थांबायचं होते. मात्र तिथे पार्किंग मिळालं नाही. ते पुढे आले. लोकांच्या मागून त्यांनी ही अडनिड्या धबधब्याची जागा शोधली. भुशी डॅमऐवजी ते लोकांच्या मागून धबधब्यावर जाण्यासाठी आले. ५०-६० लोक होते. ते धबधब्याच्या ठिकाणी गेले आणि अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि पाच जण वाहून गेले. आग्राहून आलेल्यांपैकी पती-पत्नी आणि त्यांची मेहुणी आणि चार वर्षांचं बाळ वाहून गेलं. अन्सारी कुटुंबातील चार जण वाहून गेलं आहे.’
‘भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये तीन मृतदेह आढळले. भुशी डॅममध्ये एका महिलेचा मृतदेह, एक 13 वर्षीय मुलीचा मृतदेह आणि सात वर्षांचा मृतदेह सापडला. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्री साडेसात वाजेपर्यंत बचावकार्य सुरू होतं. पण अंधार पडल्यामुळे आम्हाला सर्च ऑपरेशन थांबवावे लागले. ज्या ठिकाणी मृतदेह सापडल्यात त्याच ठिकाणी शोध सुरू करण्यात आले आहे,’ अशी माहिती बचावकार्य करणाऱ्यांनी केली आहे.
धक्कादायक Video: लोणावळा येथील भुशी डॅमवर कुटुंब गेलं वाहून…
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय अन् नाशिकमध्ये जोरदार राडा…
माजी आमदाराला अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी…
पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…