‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या…

सांगली: सांगलीतील युवा पैलवान सूरज निकम याने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरज निकम हा ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरज निकमच्या आत्महत्येमुळे सांगलीतील कुस्ती क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

पैलवान सूरज निकम हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी या गावचा रहिवासी आहे. त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पैलवान सुरजने आत्महत्या का केली याबाबत पोलिस तपास करत असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पैलवान सूरज निकम हा नामवंत मल्ल होता. त्याने यापूर्वी कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटाकविले आहेत. त्याने अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवला होता. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरज निकमने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आधी सूरजच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यामुळे तो व्यथित झाला होता. सूरजच्या निधनाचे वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

निधनानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. आज (शनिवार) दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

TCS मॅनेजर सुरभी जैन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा…

पोलिसकाकाने नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे केली आत्महत्या…

डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

पुणे शहरात व्यावसायिकाची गोळ्या झाडून आत्महत्या…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!