
अनैतिक संबंध! प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या…
जळगाव : जामनेर तालुक्यात एकाने महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी शहापूर पुरा भाग येथे घडली आहे. महिलेची हत्या केल्यानतंर पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. संगीता पिराजी शिंदे (वय ३६, रा. शहापूर पुरा) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर किरण संजय कोळी उर्फ लहान्या असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता शिंदे हिचे आरोपी किरण कोळी उर्फ लहान्या याच्यासोबत अनैतिक संबंध होते. संगीता शिंदे हिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. संगीता शिंदे ही सध्या एकटी राहत असून तिचे किरण कोळी नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. संगीता आणि किरण यांच्यात सकाळी वाद झाला होता. मयत महिला आरोपीच्या आईला शिवीगाळ करू लागली. त्यामुळे चिडलेल्या किरणने संगीताला लाकडी काठीने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर तिच्या डोक्यात दगडाने वार करत हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, घटनेची माहिती स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी किरण माळी याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास जामनेर पोलिस करीत आहेत.
नाशिक जिल्ह्यात अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा…
विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले अन्…
अनैतिक संबंधाला कटाळून महिलेची आत्महत्या; हातावर लिहीले की…
आत्याने भाच्यासोबत ठेवले अनैतिक संबंध अन् गरोदरानंतर मिळाली मोठी शिक्षा…
महिलेची अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या अन्…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

