प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेलेला प्रियकराचा होरपळून मृत्यू…

बंगळुरू (कर्नाटक): विजयपुरा येथे प्रेयसीच्या घरी भेटायला गेलेल्या प्रियकराचा आगीमध्ये होरपळल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल बिरादार असे मृत प्रियकराचे नाव आहे. या घटनेत प्रेयसीचे काका, काकू आणि नोकर असे तीन जण गंभीर जमखी झाले आहेत.

राहुल बिरादार आणि ऐश्वर्या मदारी यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते. पण घरच्यांचा विरोध होता. ऐश्वर्याचे लग्न दुसऱ्या युवकासोबत करायचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. राहुलने मैत्रिणीशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्याच्याशी पूर्णपणे नातं तोडले. राहुल सातत्याने ऐश्वर्याला भेटायचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी राहुलच्या आई-वडिलांना त्याची समजूत काढण्यास सांगितले. त्यांनी ऐश्वर्याचं लग्न इतरत्र ठरवलं आहे, असेही सांगितले.

26 मे 2024 रोजी ऐश्वर्याच्या कुटुंबीयांना राहुल त्यांच्या घराबाहेर फिरताना दिसल्यानंतर त्यांच्याशी वाद झाला. राहुल म्हणाला की, ‘मी गेल्या पाच वर्षांत ऐश्वर्यावर खूप पैसे खर्च केले आहेत. आता ती मला सोडून कशी जाऊ शकते?’ तेव्हा ऐश्वर्याच्या घरच्यांनी राहुलला हाकलून दिले. पण, त्यानंतर ऐश्वर्याने राहुलला घरी भेटायला बोलवले. राहुल तिथे गेल्यावर घरात आरडाओरड सुरू झाला. आवाज ऐकून शेजारी तिथे पोहोचले असता, त्यांना आगीत राहुल आणि इतर तीन असे एकूण चार जण जखमी अवस्थेत पडलेले दिसले. या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहुलची प्रकृती गंभीर असल्याने त्याला 28 मे 2024 ला बेंगळुरूच्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचारांदरम्यान 9 जून 2024 ला त्याचा मृत्यू झाला.

राहुल आणि ऐश्वर्या या दोघांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे एकमेकांच्या विरोधात तक्रार दिली आहे. राहुलच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटलं आहे की, ‘ऐश्वर्याने आमच्या मुलाला भेटण्याच्या बहाण्याने घरी बोलवलं, त्यामुळे राहुल तिथे गेला. तिथे ऐश्वर्याचे वडील अप्पू मदारी यांनी राहुलला पेटवून दिलं, आणि तो भाजला.’ तर, ‘राहुलनं आमच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करुन घराला आग लावली. त्यानंतर स्वत:लाही पेटवून घेतले. जाळपोळीच्या या घटनेत ऐश्वर्याचे काका, काकू आणि नोकरही भाजले गेले,’ असा आरोप ऐश्वर्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडले अन्…

धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला OYO रूमवर बोलावले अन् पुढे…

नवऱ्याच्या प्रेयसीला फोन करून बोलवलं अन् पुढे…

प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव…

आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीला चिरडले…

प्रेमप्रकरण! बिझनेस मिटींगसांगून प्रेयसीसोबत राहू लागला अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!