
भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी; दुचाकी हस्तगत…
पुणे (सुनिल सांबारे): भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाने भोसरी, पिंपरी व इतर भागात मोटार सायकली चो-या करणा-या सराईत चोरटयास अटक केली असून, त्याच्या ताब्यातून चोरीच्या एकूण २,३०,०००/- किंमतीच्या तब्बल ०७ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.
पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलिस स्टेशन हददीत मोठया प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १, स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त पिंपरी विभाग बाळासाहेब कोपनर यांनी वारंवार होणा-या मोटारसायकल चोरीच्या घटनांना पायबंद घालून मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस ठाणे यांना सुचना दिल्या होत्या.
शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस ठाणे यांनी भोसरी पोलिस ठाणे हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील पोलिस उप निरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलिस उपनिरीक्षक मुकेश मोहारे व अमंलदारांना मार्गदर्शन करून त्यांना सुचना दिल्या. तपास पथक अधिकारी, अंमलदार यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांना भेटी देउन परिसरातील सीसीटिव्ही द्वारे बारकाईने तपास केला. सातत्याने विविध ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासत तसेच सदर ठिकाणी सापळे लावुन व मोटारसायकल चोरी करणा-या चोरटयाबाबत माहिती प्राप्त केली. २६/०१/२०२४ रोजी शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस ठाणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलिस उप निरीक्षक मुकेश मोहारे, पोलिस अंमलदार सपोफौ बोयणे, पोशि २३८० नरवडे, पोशि २२१९ खाडे, पोशि २६३४ गोपी, पोशि २४४४ जाधव यांनी मोटारसायकल चोरटयांचे सीसीटिव्ही फुटेज तसेच सापळे लावुन आरोपी
मोहमंद राशीद शाहीद शेख (वय २० वर्षे, धंदा- वाशिंग सेंटरवरकामास रा. दिनेश पाटील यांचे वांशिग सेंटर, डी वाय पाटीलकॉलेजच्या बाजुला वल्लभनगर पिंपरी पुणे) यास पीएमटीचौक भोसरी पुणे येथून सापळा लावुन ताब्यात घेतले. सदर आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने भोसरी व पिंपरी शिरुर येथून चोरी केलेल्या ०७ मोटारसायकल काढून दिलेल्या असून त्या गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
भोसरी पोलिस ठाणेकडील तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय शिताफीने व कौशल्यपूर्ण तपास करून अटक आरोपी मोहमंद राशीद शाहीद शेख याच्याकडून एकूण ०७ चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करून मोटारसायकल चोरीचे एकूण ०६ गुन्हे उघडकीस आणून रूपये २,३०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड विनयकुमार चौबे, सह. पोलिस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परि. १, स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी विभाग, बाळासाहेब कोपनर यांच्या सुचना व प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, पोउनि बालाजी जोनापल्ले, पोउपनि मुकेश मोहारे, सपोफौ बोयणे, सपोफौ चव्हाण, पोलिस हवालदार, डी बी केंद्रे, रमेश भोसले, मपोहवा मुळे, पोना नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे, पोशि साळवे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी…
भोसरी पोलिसांकडून सराईत गुन्हेगार ४८ तासात जेरबंद…
पिंपरी-चिंचवड हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपींना भोसरी पोलिसांनी केले जेरबंद…
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीकडून पकडल्या ११ मोटारी; पाहा क्रमांक…
पिंपरी-चिंचवडमध्ये युनिट-४ कडून १४ गुन्हे उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

