Video: व्यापाऱ्याला बेदम मारहाण अन् नग्न करून काढली धिंड…
लखनौ (उत्तर प्रदेश): नोएडामध्ये कर्जाची परतफेड न केल्याने गुंडांनी भाजी बाजारातील विक्रेत्याला बेदम मारहाण केल्यानंतर नग्न करून धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात मानवतेला लाजवेल अशी घटना घडली आहे. युवकाला विवस्त्र करून बाजारपेठेत त्याची धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला असल्याचे पोलिसांनी सांगितलेआहे. हे प्रकरण पोलीस स्टेशन फेज-2 परिसरातील फळ मार्केटशी संबंधित आहे.
एका लसून विक्रेत्याने 3000 रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र तो ते वेळेत फेडू न शकल्याने गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला विवस्त्र करून धिंड काढली. पिडीत व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पथक तैनात करण्यात आले होते. मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
नोएडा में क्रूरता की पराकाष्ठा
लहसुन बेचने वाले युवक 5100 रुपए उधार लिए थे। 3100 रुपए बाकी रह गए थे। इसी बात पर उधार देने वाले ने युवक को नंगा करके मंडी में घुमाया। pic.twitter.com/0LvXkhCUgP— Priya singh (@priyarajputlive) September 19, 2023
मणिपूरची पुनरावृत्ती! गर्भवती महिलेला विवस्त्र करून काढली धिंड; Video Viral…
Video: ‘मुळशी पॅटर्न’चा थरारानंतर पोलिसांनी काढली गुंडांची धिंड…
Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…
सराईत गुन्हेगार वैभव इक्करची हवेली पोलिसांनी काढली धिंड…
मणिपूर विवस्त्र धिंड आणि सामूहिक बलात्कार पीडिता कारगील हीरोची पत्नी…