पुणे शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल…

पुणे : पुणे शहरातील विमाननगर परिसरात सुरू असलेला हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला असून, वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या दोन मॉडेल्सना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली असून, विदेशातून हा वेश्या व्यवसाय चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागात गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईन वेश्या व्यवसाय सुरू होता. राजस्थानी अभिनेत्रीसह दोन उजबेकिस्थानी मॉडेलला ताब्यात घेतले आहे. उजबेकिस्थानमधून आलेल्या दोन मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय करत होत्या. परदेशातून ऑनलाईन पद्धतीने वेश्या व्यवसाय भारतात चालवण्यात येत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. वेश्या व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने चालवणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे शहरात यापूर्वी मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चार पीडित युवतींची सुटका केली होती. पुणे शहरात सध्या पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. त्यात रात्रीच्या वेळी गस्त घालण्यापासून तर खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर सापळा रचून छापा टाकण्यापर्यंत पोलीस उपाययोजना करण्यात येत आहे आणि अनेक अवैध व्यवसायावर कारवाई देखील करण्यात येत आहे.

पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. अनेक हायप्रोफाइल प्रकरणे उघडकीस आणली होती. मसाज पार्लर स्पाच्या नावाने चालणाऱ्या व्यवसायांवर करडी नजर ठेवली जाणार असून नागरिकांना असं काही आढळल्यास थेट तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…

पिंपरी-चिंचवडमध्ये लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…

पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!