
प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल पोलिसांची कोर्टात स्फोटक माहिती; आक्षेपार्ह व्हिडिओ अन्…
पुणे : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणातील प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच आरोपींची कोठडी आज संपल्यामुळे शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी कोर्टामध्ये प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती दिली. प्रांजल यांनी एका महिलेचा व्हिडीओ नाचताना दुसऱ्या आरोपीला पाठवला होता. त्यात एक मुलगी नाचताना दिसत असून, ज्यात म्हटलं की ‘ऐसा माल चाहिए’, प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट सापडले, असा दावा पोलिसांनी केला आहे. पण, न्यायालयाने खेवलकरांसह पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली असून आता जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेडकर अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. दोन दिवसांची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच आरोपींना पुणे पोलिसांनी शिवाजीनगर कोर्टात हजर केले. यावेळीही रोहिणी खडसे आज पुन्हा वकिली पोशाख घालून न्यायालयात हजर होत्या. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी ५ ही आरोपींना ३ दिवसांची पोलिस कोठडी द्या अशी मागणी केली. यावेळी सरकारी वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
आरोपी तपासत उडवा उडवीची उत्तर देत आहेत. आधी सांगत होते की आम्ही ओळखत नाही एकमेकांना पण हे सगळे आधीपासून एकमेकांना ओळखतात. अनेकदा यांनी सोबत पार्ट्या केल्या आहेत. अमली पदार्थ कुठून आणला हे तपासायाचं आहे. Laptop आणि मोबाईल तपासायाचे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
तपास अधिकारी म्हणाले, ‘प्रांजल खेवलकर यांनी एका महिलेचा व्हिडीओ नाचताना दुसऱ्या आरोपीला पाठवला होता. त्यात एक मुलगी नाचताना दिसत आहे ज्यात म्हटलंय की ‘ऐसा माल चाहीए’. यातील महिला आरोपी आणि प्रांजल २ वर्षापासून एकमेकांशी बोलतात. हा अमली पदार्थ यांनी आणला. परंतु कुठून आणला हे सांगत नाहीत. गेली २ वर्ष प्रांजल हे त्या हॉटेलमध्ये येतात पार्टी करतात. राहुल नावाचा अजून एक आरोपी आहे तो फरार आहे. आम्हाला अजून पोलिस कोठडी हवी आहे. प्रांजल यांच्या मोबाईलमध्ये अनेक गोष्टी आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या आहेत, व्हिडिओ आहेत त्याबाबत तपास करायचा आहे, असा माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली.
पुणे रेव्ह पार्टीत जावयाला अटक, एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…
पुणे शहरातील लॉज मालकांना आणि लॉजवर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

