IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

वाशिम: पोब्रेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम येथे बदली करण्यात आली होती. पूजा खेडकर यांनी आज (गुरुवार) वाशिममध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाचा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पूजा खेडकर यांना त्यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा आणि आरोपांबद्दल विचारण्यात आले. त्यावर पूजा खेडकर यांनी म्हटले की, मला सध्या काहीही बोलण्याची परवानगी नाही. मला वाशिममध्ये रुजू होताना आनंद होत असून, मला वाशिममध्ये काम करायला आवडेल. मला सरकारने काहीही बोलण्यासाठी परवानगी दिलेली नाही.’ पत्रकारांनी त्यांच्या उत्पन्नावरुन, नॉन-क्रीमिलेअर सर्टिफिकेटवरुन सुरु असलेल्या वादाबाबत प्रश्न विचारल्यावर म्हणाल्या, ‘मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, या प्रकरणात मला सरकारने काही बोलायला परवानगी दिलेली नाही. असे सांगून तिथून निघून गेल्या.’

दरम्यान, पूजा खेडकर या महाराष्ट्र केडरच्या 2022 च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, या काळातील पूजा खेडकर यांचा रुबाब जिल्हाधिकाऱ्यांनाही लाजवणार होता. प्रोबेशनरी अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र केबिन किंवा गाडीची सुविधा नसते. मात्र, पूजा खेडकर या स्वत:च्या खासगी ऑडी गाडीवर लाल-निळा दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी नेमप्लेट लावून फिरायच्या. याशिवाय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावून पूजा खेडकर यांनी तिकडे स्वत:चे कार्यालय थाटले होते. या कार्यालयातील फर्निचरही पूजा खेडकर यांनी बदलले होते. या सगळ्या सरंजामी थाटामुळे पूजा खेडकर या सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अखेर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून त्यांच्या बदलीची शिफारस केल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला होता.’

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पूजा खेडकर यांची पुण्यावरून थेट वाशिम येथे बदली करण्यात आली. 8 जुलै रोजी बदलीच्या आदेशानुसार खेडकर शासनाकडून रुजू करण्याचे आदेश काढण्यात आले होते. नऊ तारखेला त्या संदर्भात तसे पत्र वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मिळाले होते. काल दुपारीला हे पत्र वाशिम जिल्हा अधिकारी प्राप्त झाले होते. आज पूजा खेडकर ह्या प्रोबेशनल अधिकारी म्हणून वाशिम जिल्हाअधिकारी कार्यालयात वाशिम जिल्हा अधिकारी बूवनेश्वरी एस यांची त्यांनी भेट घेऊन आज अधिकृतपणे त्यांनी आपला शिकाऊ उमेदवाराचा पदभार सांभाळला. आज जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांशी भेटी घेऊन उद्या पूजा खेडकर सार्वजनिक बांधकाम विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून चार्ज स्वीकारणार आहेत.

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

अधिकाऱ्यांनी युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी; चेंबरमध्ये बोलावले अन्…

वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…

कोल्हापूर हळहळलं! दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू…

हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!