
पुणे! दरोडेखोरांकडून वॉकी-टॉकीचा वापर; १२०० किलोमीटरपर्यंत माग काढत केली अटक…
पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरात काही दिवसांपूर्वी सहा दरोडेखोरांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात १९ जुलै रोजी दरोडा टाकला होता. बांधकाम व्यावसायिक घरात एकटे असताना अचानक सहाजण घरात घुसले, त्यांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत व्यावसायिकाचे हातपाय बांधले. यानंतर आरोपींनी घरातील किमती ऐवज लुटल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.
बांधकाम व्यावसायिक चंद्रभान अगरवाल यांच्या घरात टाकलेल्या या सशस्त्र दरोड्याचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी तब्बल १२०० किलोमीटरपर्यंत माग काढून राजस्थानमधून त्यांना अटक केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींचा जयपूरपर्यंत पाठलाग केला आणि त्यांना अटक केली.
या दरोड्याचा मुख्य सूत्रधार सुभाष बिश्नोई हा जयपूर येथील एक कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी गेल्या दोन महिन्यांपासून या दरोड्याची तयारी केली होती. सुभाष बिष्णोई, महिपाल बिष्णोई आणि सुरेश ढाका असे अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. यातील सुरेश ढाकावर तब्बल २१ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपींनी या गुन्ह्यात मोबाईल ट्रेस होऊ नये, म्हणून चक्क वॉकी-टॉकीचा वापर केला होता. त्यामुळे हा दरोडा नेमका कुणी टाकला, याबाबत काहीच माहिती पोलिसांना मिळत नव्हती. पण आरोपी ज्या कारमधून आले होते, त्या कारच्या नंबरप्लेटवरून पोलिसांनी आरोपींचा माग काढला. यानंतर १२०० किलोमीटर दूर असलेल्या जयपूरमधून तिघांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून चार वॉकी-टॉकी जप्त केले आहेत. तीन आरोपींचा शोध सुरू असून, त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल पोलिसांची कोर्टात स्फोटक माहिती; आक्षेपार्ह व्हिडिओ अन्…
मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; 17 वर्षांनंतर निकाल जाहीर…
नांदेडमधून अपहरण केलेली मुलगी सापडली; धक्कादायक कारण समोर…
वाल्मिक कराडचा राइट हँडचं अघोरी कृत्य; राम नाम सत्य है…
मुंबईतील शिक्षिकेचे व्हिडिओ कॉल करून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे…

