
पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जात असून, ‘पुणे गणपती (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. शिवाय, पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी व ई-पेपरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच १) www.puneganpati.com ही वेबसाईट, २) ‘पुणे गणपती (२०२५-२६)’ पुस्तक आणि ३) गणपती मंडळांच्या ई-पेपरचे एकाचवेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे. पोलिसकाकाच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे.
पुणे गणपतीच्या वेबसाईटवर गणपती मंडळांची सविस्तर माहिती, व्हिडिओ, छायाचित्र दिले जात आहे. शिवाय, गणपती मंडळाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहोत. शिवाय, मंडळाने लाखो रुपये खर्च करून केलेला देखावा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षेभर पाहता येणार आहे. प्रत्येक इच्छुक गणपती मंडळाची स्वतंत्र पुरवणी तयार करून ई-पेपरच्या माध्यमातून वर्षभर वाचकांना वाचायला मिळणार आहे. शिवाय, गणपती मंडळांचे अहवाल सुद्धा ई-पेपरच्या माध्यमातून प्रसिद्ध करणार आहोत.
दरम्यान, गणपती मंडळांनी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपर तयार करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन टीम पुणे गणपतीच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
WhatsApp: 93712 69949
Email: puneganpatidairy@gmail.com
गणपती मंडळांची पुरवणी चार पानांची असणार आहे. पहिल्या पान गणपती मंडळासाठी तर चार नंबरचे पान हे संबंधित भागातील राजकीय नेता अथवा जाहिरातदाराच्या माहितीसाठी ठेवण्यात आले आहे. संबंधित पुरवणीची छापाई करू शकतो अथवा ई-पेपर म्हणून ठेवू शकतो. नमुना पुरवणीची चार पाने पुढीलप्रमाणे…
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

