दिवाळीच्या दिवशीच छोट्या भावाने केला मोठ्या भावाचा खून…

सांगली : कापरी (ता. शिराळा) येथे पैशाच्या वादातून छोट्या भावाने मोठ्या भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केल्याची घटना दिवाळीच्या दिवशीच (ता. १२) घडली आहे. महेश राजेंद्र मोरे (वय २७) याचा जागेवरच मृत्यू झाला असून, संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे (वय २२) हा फरार झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिराळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेश मोरे व संशयित आरोपी अविनाश मोरे (मुळ रा. हालोंडी ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, सध्या रा. कापरी, ता. शिराळा ) हे आईसह लहानपनापासून आजोळी मामा व आजीकडे (कापरी ता. शिराळा) येथे रहात होते. त्यांचे वडील गावाकडेच असतात. महेश याचे लग्न झाले असून त्याचा घटस्फोट झाला आहे. महेश व अविनाश दोघांमध्ये पैशांवरून वारंवार भांडणे होत होती. दोघे ही सेट्रिंगवर कामावर जात होते.

महेश कामाचे पैसे घरात देत नसल्याने घरात सतत वादावादी होत होती. रविवारी रात्री अविनाश याचे आई व भावाबरोबर भांडण झाले. घराच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर दोघांची भांडणे सुरू झाली होती. यावेळी संशयित आरोपी अविनाश याने महेशच्या डोक्यात लाकडी दांडके घातले. यामध्ये महेश गंभीर जखमी झाला व खाली कोसळला. डोक्यात गंभीर माराहाण झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला.

महेश याचे शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून कापरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश याच्या मागे आई वडील असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

दिवाळीच्या दिवशीच पत्नीची गळा दाबून हत्या…

धक्कादायक! मोठ्या भावाने घेतले उसने पैसे अन् खून झाला छोट्या भावाचा…

लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; कारण आले पुढे…

हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!