पुणे शहरातील लॉज मालकांना आणि लॉजवर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

पुणे: पुणे शहरातील लॉज मालक आणि चालकांना पुणे पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. लॉजमध्ये रुम देण्यापूर्वी लॉज चालकांनी ग्राहकांची शाहनिशा करूनच रुम द्यावी, अशा सूचना पुणे पोलिसांनी लॉज चालक आणि मालकांना दिल्या आहेत. ग्राहकांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतरच ते लॉजमध्ये राहू शकतात.

पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुण्यातील लॉज मालक आणि चालकांना या सूचना दिल्या आहेत. लॉजवर राहायला येणाऱ्या सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून रजिस्टर मध्ये नोंद करावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील लॉजचे मालक- चालक यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि लॉज मालक- चालक हजर होते. पुणे पोलिसांच्या परिमंडळ ५ कडून हद्दीतील लॉज मालक आणि अधिकारी यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत पोलिसांनी लॉज मालक चालकांसोबत चर्चा केली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा झाली. त्यानंतर पोलिसांनी काही महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.

लॉजमध्ये परदेशी नागरिक राहण्यास आला असेल, तर त्याच्याकडून सी फॉर्म भरून घ्यावा, तसेच त्याचे पासपोर्ट आणि व्हिजाची छायांकित प्रत घेऊन रजिस्टरमध्ये नोंद करावी. तसेच लॉजच्या प्रवेशद्वारावर आणि सभोवती येणारे जाणारे रस्ते कव्हर होतील, अशा पद्धतीने एचडी आणि नाईट व्हिजन कॅमेरे बसवण्यात यावेत, अशा सूचना देखील पोलिसांनी दिल्या आहेत. लॉजमध्ये संशयित व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिस कंट्रोल रुमला माहिती द्यावी, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Pahalgam Terror Attack! बैसरन व्हॅलीत चीनमध्ये बनवलेले सॅटलाईट फोन होते सक्रिय…

पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!