माजी आमदाराच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीमध्ये तूतू-मैमै…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीमध्ये तूतू-मैमै झाले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पांढरकवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत मराठी शाळेच्या मैदानावर 12 फेब्रुवारी 2019 रोजी कबड्डी सामने आयोजीत केले होते. सदर कबड्डी सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी पांढरकवडा येथील वाय पॉईंटजवळ माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांची दुसरी पत्नी प्रिया अशोक शिंदे आल्या होत्या. तेवढ्यात माजी आमदार प्रा. राजू तोडसाम यांची पहिली पत्नी अर्चना राजु तोडसाम या रात्री 10 वाजता सुमारास बोलेरो गाडीने जंगोबाई टेकडी येथून परत येत असतांना यातील प्रिया अशोक शिंदे (रा. आर्वी जिल्हा वर्धा) ही तिच्या ड्रायव्हरसह चुकीच्या दिशेने आली व बोलेरो गाडीला धडक देऊन गाडीचे नुकसान केले. त्यामुळे बोलेरो चालक गणेश घोडाम, कांताबाई घोडाम, शिला गेडाम, अक्षय नवाडे, शेख सर, सुरज जाधव आदींनी बोलेरो गाडीला धडक कां मारली? अशी विचारणा केली.

प्रिया शिंदे यांनी गाडी खाली उतरुन फिर्यादी अर्चना राजु तोडसाम हिला शिवीगाळ केली. आज फक्त धडक मारली उद्या तुला व तुझ्या मुलांना जिवानिशी मारुन टाकीन अशा आशयाचा रिपोर्ट माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांची पहिली पत्नी अर्चना राजु तोडसाम हिने पांढरकवडा पोलिस ठाण्यात दाखल केला. यावरुन पांढरकवडा पोलिस ठाण्यात आरोपी माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांची दुसरी पत्नी प्रिया अशोक शिंदे (रा. आर्वी) विरुद्ध अपराध क्रमांक 196/2019 भांदवि कलम 279, 294, 506 सहकलम 3 (1) (R) (S), 3 (2) (va) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रका 9RR/177 मोवाका अंतर्गत पांढरकवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्ह्यांचे अन्वेषना दरम्यान फिर्यादी माजी आमदाराची पहिली पत्नी अर्चना राजू तोडसाम यांनी दुसरी पत्नी आरोपी प्रिया अशोक शिंदे विरुद्ध जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी दिल्याबाबतचा खोटा रिपोर्ट दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पांढरकवडा येथील तत्कालीन उप विभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी सदर गुन्ह्यात ब समरी तयार करून पांढरकवडा येथील जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत एस. सातभाई यांच्या न्यायालयात मंजुरीस सादर केला. परंतु, फिर्यादी अर्चना राजु तोडसाम हिने ब समरी मंजुरीस आक्षेप घेतल्यामुळे सदर प्रकरण फेर तपास करण्यासाठी पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांचे कडे जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांच्या न्यायालयाने परत पाठवले.

दरम्यान, आमदाराची दुसरी पत्नी प्रिया अशोक शिंदे यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या लेखी तक्रारीवरुन पहिली पत्नी अर्चना राजु तोडसाम यांचे सह मनिष रामगिरवार, नागोराव गेडाम, रुपेश चौधरी, चालक गणेश घोडाम, आकाश उर्फ मोनू कणाके, महेंद्र कर्णेवार, अक्षय नवाडे, सुरज जाधव व आकाश येवले आदीं आरोपी विरुद्ध भादंवि कलम 143, 147, 149, 394, 354(B), 341, 294, 504, 506, 323, 279, 337, 500 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

सदर प्रकरण पांढरकवडा येथील दिवाणी न्यायाधिश (ज्युनिअर डिव्हीजन) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोप साठी आहे. एकंदरीत सदर प्रकरणात सहाय्यक सहकारी वकील ॲड. प्रशांत मानकर, फिर्यादी अर्चना राजु तोडसाम यांचे वकील ॲड. माणीक चौधरी यांनी आप आपले लेखी म्हणने जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत एस. सातभाई यांच्या न्यायालयात सादर केले आहे.

आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन; म्हणाला…

विवस्त्र महिला धावतानाचा व्हिडिओ व्हायरल; भाजप आमदार पत्नीविरोधात गुन्हा दाखल…

आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

आमदारपुत्राची दादागिरी; बंदुकीच्या धाकाने व्यावसायिकाचे अपहरण…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!