धक्कादायक! प्रियकर आणि प्रेयसीने चिरले एकमेकांचे गळे…

जयपूर (राजस्थान) : एका प्रेमी युगुलाने चाकूने एकमेकांचा गळा चिरला असून, या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला आहे तर प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जखमी प्रियकराला रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर शहरातील हरमदा पोलिस स्टेशन परिसरात सोमवारी (ता. २) ही घटना घडली. दोघंही एकाच गाडीतून लोहा मंडीत आले होते. लोहा मंडई रोडवर एक युवक आणि युवतीने चाकूने एकमेकांचा गळा चिरला. या घटनेने परिसरात खळबळ उडाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. चाकूने गळा कापल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर मुलीचा मृत्यू झाला. ज्योती असे मृत युवतीचे नाव आहे. किशन असे जखमी युवकाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच हरमदा पोलिस ठाण्याचे प्रभारी हिम्मत सिंह घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून ही घटना झाल्याची माहिती पुढे आली आहे. दोघांनीही आत्महत्या केली की आणखी काही घटना घडली याचा पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांना विवाह करायचा होता. पण, दोघांच्या विवाहाला कुटुंबियांचा विरोध होता. यामुळे दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…

प्रेयसीचा गळा चिरणाऱ्या प्रियकराला पश्चिम बंगालमधून वेशांतर करून पकडले…

प्रियकराला घरी बोलावून प्रायव्हेट पार्टवर केले ब्लेडने वार…

प्रियकराची वाट पाहून आलाच नाही; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म…

प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला प्रियकराला पकडले अन् विवस्त्र करून…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!