Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे : पुणे शहरातील एफसी रोडवर असणाऱ्या एका पबमध्ये काही युवक अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने कारवाई करत पब सील करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, दोन पोलिस कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहरातील एफसी रोडवर असलेल्या एल ३ पबच्या स्वच्छतागृहात काही युवक अंमली पदार्थ सेवन करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. एल ३ पब हा संतोष आणि सचिन विठ्ठल कामठे यांच्या मालकिचा आहे. त्यांनी रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र गिरासे यांना चालवण्यासाठी दिला आहे. पबमध्ये शनिवारी अक्षय कामठे याने ५० ते ६० जणांना पार्टी करायची असल्याचे सांगितले. रात्री पार्टी करण्यासाठी पबचालकांनीही परवानगी दिली. ती पार्टी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती आणि याच पार्टीत अंमली पदार्थांचं सेवन केले जात असल्याची धक्कादायका माहिती समोर आली.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

पोलिसांनी ड्रग्ज पार्टी प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये पार्टीचे आयोजन करणाऱ्या अक्षय कामठे याला रात्री उशिरा अटक केली. तर आणखी चौघांचा शोध घेतला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

policekaka-special-offerपोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

दरम्यान, पबमधील ड्रग्ज प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कडक कारवाईचे आदेश दिले. जिथे ड्रग्ज आढळून आले तिथे पोलिस कठोर कारवाई करतीलच. तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंतही पोलिस पोहोचतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईप्रमाणे ड्रग्जमुक्त महाराष्ट्र व्हावा अशी भूमिका सरकारची आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई…

पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ…

Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…

पुणे जिल्ह्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; कंपनी सील; ड्रग्ज जप्त…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल याला जामीन; पण…

पुणे शहरात कोयता गँगने धुमाकूळ घालत केली वाहनांची तोडफोड…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!