राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…

पुणेः वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यालाही अटक झाली. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झाली आहे.

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांच्या अटकेनंतर पोलीसांच्या रेकॉर्डनूसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजेंद्र हगवणे गेल्या 7 दिवसांत कुठे कुठे फिरला, याबाबत माहिती समोर आली आहे. गेल्या 7 दिवसांत वेगवेगळ्या गाड्या बदलत राजेंद्र हगवणे फिरत होता. 17 मे रोजी जर राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता. तसेच राजेंद्र हगवणे 22 मे रोजी पुन्हा पुण्यात परतल्याचं पोलीस रेकॉर्डद्वारे समोर आले आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

राजेंद्र हगवणेचा 17 मे ते अटके पर्यंतचा प्रवास…
17 मे-
– औंध हॉस्पिटल
– मुहूर्त लॉन्स (थार गाडीने)
– वडगाव मावळ
– पवना डॅम (फार्म हाऊस)
– आळंदी येथे लॉजवर

18 मे-
– वडगाव मावळ
– पवना डॅम (बंडू फाटक कडे बलेनो गाडीने)

19 मे-
– पुसेगाव ( सातारा) अमोल जाधव यांच्या शेतावर

19 मे आणि 20 मे-
पसरणी मार्गे कोगनोळी (हॉटेल हेरीटेज)

21 मे-
कोगनोळी (प्रीतम पाटील या मित्र्याच्या शेतावर)

22 मे-
पुण्याला परत आणि रात्री दोनच्या सुमारास अटक

दरम्यान, वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (ता. 16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणे चालू केले होते. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…

पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…

पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…

पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!