
राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…
पुणे: पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे बडतर्फ सदस्य राजेंद्र हगवणे याच्या सूनबाई वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आत्महत्येप्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये वैष्णवीला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. सुनेच्या मृत्यूनंतर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे दोघंही फरार झाले होते. अखेर आठ दिवसांनी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं प्रकरण समोर आल्यानंतर आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यामुळे दोघांना अटक करण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव होता. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोघांना पुण्यातील स्वारगेट परिसरातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. दोघंही पुण्यातील एका खेडेगावात लपून बसले होते, अशीही माहिती मिळाली आहे.
वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पकडण्यासाठी सहा टीम तयार करण्यात आल्या होत्या. यातील काही टीम्स दोघांचा शोध घेण्यासाठी परराज्यात देखील जाऊन आल्या. मात्र दोघांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. त्यांनी सुशील हगवणे याच्या काही मित्रांची उचलबांगडी केली. त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांनी राजेंद्र हगवणेचा भाऊ संजय हगवणे याला देखील रात्री उचलले. त्याचीही कसून चौकशी केली. सुशीलचे मित्र आणि राजेंद्र हगवणेच्या भावाची चौकशी केली असता पोलिसांना या दोघांचा ठावठिकाणा समजला. यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण देखील केले. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. दोन्ही बाबींची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत रात्री दोनच्या सुमारास दोघांना अटक केली.
‘तांबडा पांढरा रस्सा’ हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज…
राजेंद्र हगवणे याचे तळेगाव परिसरातील ‘तांबडा पांढरा रस्सा’ हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या हॉटेलवर राजेंद्र हगवणे मटणावर ताव मारताना दिसत आहे. त्याच्यासोबत काही मित्र होते, पण हे मित्र कोण होते? याची माहिती अद्याप समोर आली नाही.
दरम्यान, कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन निलेश चव्हाण याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…
वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…
पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…
पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…
पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…
पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…
पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..
पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

