
हगवणे कुटुंबियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तुल दाखवले अन् म्हणाले…
पुणे : वैष्णवी हगवणे या सुनेचा पैशासाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हगवणे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये, पती शशांक आणि सासरा राजेंद्र सध्या तुरुंगात असून आता आणखी एका व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसंदर्भात माहिती दिली आहे. खेड तालुक्यातील निगोजे गावच्या प्रशांत येळवंडे यांनी लता राजेंद्र हगवणे व शशांक राजेंद्र हगवणे यांच्याकडून जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची पोलिस तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’
प्रशांत येळवंडे यांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्यासमवेत 24 लाख रुपयांचा जेसीबी विकत घेण्याचा मार्च 2022 मध्ये केला होता. व्यवहार ठरला तेव्हा प्रशांत येळवंडे यांनी त्यांना पाच लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला होता. सदर जेसीबीवर रुपये 19 लाख रुपयांचे बँकेचे कर्ज असल्याने कर्जाचे हप्त भरण्यासाठी प्रशांत येळवंडे यांनी ठरल्याप्रमाणे हगवणे यांना दरमहा रुपये 50 हजार देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे हप्ते भरण्यासाठी एकूण रुपये 6 लाख 70 हजार लता हगवणे यांच्या अकाउंटवर जमा करण्यात आले होते. मात्र, हगवणे यांनी बँकेचे हप्ते भरले नाही व सदर रक्कम स्वतःसाठी वापरली. त्यामुळे सदर जेसीबी कर्ज देणारी इंडसइंड बँकेने प्रशांत येळवंडे यांच्याकडून ऑगस्ट 2024 मध्ये ताब्यात घेतला. त्यानंतर हगवणे यांनी सदर जेसीबी बँकेकडून सोडवून घेतला. पण प्रशांत येळवंडे यांच्या पुन्हा ताब्यात दिला नाही. त्यामुळे प्रशांत येळवंडे हे त्यांची एकूण रक्कम 11 लाख 70 हजार रुपये परत मिळावी किंवा जेसीबी त्यांना ताब्यात द्यावा यासाठी हगवणे यांच्याकडे पाठपुरावा करत होते.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
हगवणे यांनी त्यांना दाद दिली नाही. तसेच प्रशांत येळवंडे यासंबंधी एकदा चर्चा करण्यासाठी गेले असता शशांक हगवणे यांनी त्यांच्या कमरेला लावलेल्या पिस्तूलवर हात ठेवून त्यांना “तू मशीन 14 महिने वापरली आहे, आता पैसे मागू नको नाही तर घरचे नीट राहणार नाहीत” अशी धमकी दिली होती. सतत पाठपुरावा करून देखील रक्कम किंवा जेसीबी न मिळाल्याने प्रशांत येळवंडे यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे येथे कारवाई करण्यासाठी तक्रारी अर्ज दिलेला असून सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही चालू आहे.
मोठी बातमी! कारागृहाचे महानिरिक्षक IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर मोठी कारवाई…
वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत…
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! काळी जादू, अश्लील व्हिडीओ अन् पत्नीचा छळ…
वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले…
राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…
राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…
वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…
वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…
पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…
पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…
पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…
पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…
पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..
पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

