
वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…
पुणे: वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते, बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना भेटत नव्हता. ते बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होते. मात्र, आता अखेर त्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना मिळाला आहे. नातवाला पाहिल्यावर आजोबांच्या डोळ्यात पाणी आले.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
वैष्णवीच्या वडिलांनी माहिती देताना सांगितले की, माझ्या भावाकडे एका अज्ञात व्यक्तीने ते बाळ आणून दिले. बाळाच्या रूपाने आम्ही वैष्णवीला पाहतो आहोत. वैष्णवी म्हणून आम्ही पुढे त्या बाळाचा संभाळ करणार आहोत. मला कोणाचाही फोन आला नाही, भावाला फोन आला होता. बाळ कुठे होतं ते माहिती नाही, असंही ते म्हणाले. वैष्णवीचे काका मोहन कस्पटे ज्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला त्यांनी माहिती देताना सांगितलं की, मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तुम्ही बाणेर हायवेला या माझ्याकडे बाळ आहे. आम्ही त्यांना म्हटलं आम्ही पिंरगुटला चाललो आहोत. ते म्हणाले आम्ही बाणेर हायवेजवळ आहे, तिथे या बाळ माझ्या ताब्यात आहे. तिथे गेल्यानंतर बाळ त्यांनी आमच्या ताब्यात दिले आणि ते तिथून निघून गेले. ते कोण होते त्याची कोणतीही माहिती नाही. दोन दिवसांपासून बाळाचा शोध सुरू होता, अशी माहिती मोहन कस्पटे यांनी दिली आहे. आमचं बाळ आम्हाला मिळालं आहे, त्यामुळे आम्हाला आंनद आहे, असेही ते पुढे म्हणाले आहेत.
दरम्यान, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा अशा आयोगाने सूचना दिल्या आहेत. जर आरोप खरे असल्याचे आढळून आले तर सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयोगाने महाराष्ट्र पोलिसांकडून तीन दिवसांच्या आत सविस्तर कारवाई अहवाल मागितला होता, तो अहवाल आज पोलिसांकडून आयोगाला अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे आणि पती शशांक हगवणे या दोघांची राष्ट्रवादीने हकालपट्टी केली आहे, पण एवढं करुन चालणार नाही. तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा. अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे. राज्य महिला आयोग पदी ही अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर आहेत, त्यांनी जे वक्तव्य दिलं ते योग्य आहे. पण त्यांनी अद्याप आम्हाला एकदा ही संपर्क साधला नाही. किंबहुना अजित पवार गटाकडून कोणीही आमचं सांत्वन करायला आले नाही, अशी खंत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी व्यक्ती केली.
पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…
पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…
पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…
पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…
पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..
पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

