वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत…

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील राजेंद्र हगवणे आणि इतर आरोपींचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे आणि त्याचा मोठा भाऊ सुशील हगवणे यांचा आणखी एक कांड समोर आले आहे. त्यांच्या या कांडमुळे आयपीएस अधिकारी देखील गोत्यात येण्याची शक्यता आहे.

पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’

हगवणे कुटुंबाने पुणे पोलिस आयुक्तालयाकडून पिस्तूल परवाना मिळवताना पुण्यातील बनावट पत्ता सादर केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, 2022 मध्ये केवळ एका दिवसात हगवणे कुटुंबातील दोघे आणि त्यांचा सहकारी अशा तिघांना परवाने मिळाले होते. मुळचे भूकुम गावचे असलेले आणि सध्या बावधनमध्ये वास्तव्यास असलेले राजेंद्र हगवणे यांचे कुटुंब, पोलिस नोंदीनुसार, पुणे ग्रामीणच्या पौड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. मात्र परवाना मिळवताना त्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत असल्याचा भाडेकरार सादर करून पुणेकर असल्याचे भासवले. त्याच पद्धतीने नीलेश चव्हाण यानेही वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यांतर्गत पिस्तूल परवाना घेतल्याचे समोर आले आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

शशांक हगवणे, सुशील हगवणे आणि नीलेश चव्हाण या तिघांना 2022 मध्ये एकाच दिवशी परवाने देण्यात आले. शशांक व सुशील हे सख्खे भाऊ असून, त्यांच्या अर्जातही पुण्यातील तात्पुरत्या वास्तव्याचा दाखला देण्यात आला होता. चौकशीत त्यांनी पोलिस यंत्रणेची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत हगवणे कुटुंबाचा एक नातेवाइक त्या काळात पुणे पोलिस दलात कार्यरत होता, अशी माहिती समोर आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका आणि त्यांची निर्णयप्रक्रिया आता तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! काळी जादू, अश्लील व्हिडीओ अन् पत्नीचा छळ…

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले…

राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…

राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…

पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…

पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…

पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!