मोठी बातमी! कारागृहाचे महानिरिक्षक IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर मोठी कारवाई…

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप असलेले हगवणे यांचे नातेवाईक IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर झाल्यानंतर त्यांचे अधिकार काढून घेतले जावेत, अशी मागणी सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून झाल्यानंतर गृहखात्याने मोठा निर्णय घेतला आहे. सुपेकर यांच्याकडील तुरुंग उपमहानिरीक्षक पद जैसे थे ठेवून त्यांच्याकडून अधिकार काढून घेण्यात आले आहेत.

पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’

पुणे शहराजवळील भुकूम गावातील वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपी शशांक हगवणे याचे मामा जालिंदर सुपेकर यांच्यावर विविध आरोप झाले. सुपेकर हे दबाव आणून आरोपींचा बचाव करीत असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या चौकशीची मागणी होऊ लागली. अखेर गुरूवारी गृहखात्याने मोठा निर्णय घेत सुपेकर यांचे अधिकार काढून घेतले. गृहखात्याने शासन निर्णय जारी करून कारवाईची माहिती दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जालिंदर सुपेकर यांच्यासंदर्भातील अनेक पुरावे समोर आणत त्यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे 500 कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू असल्याची बाबही अंजली दमानिया यांनी निदर्शनास आणून दिली होती. तसेच, वैष्णवी प्रकरणात हगवणे यांच्याकडून जालिंदर सुपेकर यांच्या नावाने धमकी देत कस्पटे कुटुंबीयांवर व पोलिसांवर दबाव टाकल्याचेही समोर आले होते. त्यानुसार, आता जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

वैष्णवीच्या वडिलांनी आजच पत्रकार परिषद घेऊन आरोपींच्या वकिलांकडून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यावेळी, पत्रकार परिषदेत जालिंदर सुपेकर हे मुलाचे मामा असल्याचे म्हटले होते. मुलाच्या जन्मपत्रिकेत मामा म्हणून त्यांचे नाव आहे, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर, काही वेळातच त्यांच्याकडून अतिरिक्त पदभार काढून घेतल्याचे समोर आले आहे.

जालिंदर सुपेकर हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजी नगर, नाशीक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. “कारागृह उप महानिरीक्षक” हे कारागृह विभागातील अत्यंत महत्वाचे व जबाबदारीचे पद आहे. सध्या कारागृह विभागाच्या “कारागृह उप महानिरीक्षक” या संवर्गात 5 पदे मंजूर आहेत. त्यांपैकी 2 पदे भरलेली असून 3 पदे रिक्त आहेत. जालिंदर सुपेकर यांच्याकडे “विशेष पोलिस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे” या पदाचा नियमित कार्यभार आणि कारागृह विभागातील “कारागृह उप महानिरीक्षक” या संवर्गातील पाच पदांपैकी रिक्त असलेल्या तीन पदांचा (नाशिक विभाग, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर) अतिरिक्त कार्यभार आहे. मात्र, आता शासनाने सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे. नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर येथील त्यांच्याकडे असलेली जबाबदारी काढून घेण्यात आल्याने ही त्यांच्यावर मोठी कारवाई असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.

जालिंदर सुपेकर यांच्याकडून हा पदभार काढून घेतल्यानंतर, नागपूरची जबाबदारी उपमहानिरीक्षक स्वाती साठे, नाशिकची जबाबदारी अधीक्षक अरुणा मुगटराव आणि नागपूरची जबाबदारी अधीक्षक वैभव आगे या तीन अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे.

शासनाच्या आदेश पत्रात म्हटले की…
“विशेष पोलिस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे” हे जबाबदारीच्या दृष्टीने अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, या पदानंतर महत्वाचे पद आहे. त्यामुळे, जालिंदर सुपेकर यांच्याकडे असलेल्या “कारागृह उप महानिरीक्षक” या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा (नाशिक विभाग, नाशिक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर) अतिरिक्त कार्यभार ठेवणे प्रशासकीयदृष्ट्या उचित नाही, असे संबंधित आदेशात म्हटले आहे. तसेच, “कारागृह उप महानिरीक्षक” या कनिष्ठ संवर्गातील पदाचा कार्यभार “विशेष पोलिस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे” या वरिष्ठ संवर्गातील पदावर कार्यरत असलेल्या अधिका-याकडे सोपविणे योग्य नाही. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्याकडील “कारागृह उप महानिरीक्षक” या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कारागृह विभागातील इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार, या तिन्ही पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत…

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! काळी जादू, अश्लील व्हिडीओ अन् पत्नीचा छळ…

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले…

राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…

राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…

पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…

पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…

पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!