पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात रात्रीच्या शिफ्टसाठी कामावर निघालेल्या एकाने युवतीवर (वय २७) बलात्कार केल्याचा प्रकार 13 मे रोजी उशिरा घडला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडितेच्या धैर्यामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपीस अवघ्या चोवीस तासांत अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर…
www.puneganpati.com

आरोपीला पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक केली आहे. प्रकाश तुकाराम भांगरे (वय २७, सध्या रा. मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. अकोले, जि. अहिल्यानगर) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर, न्यायालयाने त्याला 20 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ‘रस्त्याने जात असलेली महिला मला दिसली आणि मी तिला बाजूला ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला,’ असा कबुली जबाब आरोपीने दिला आहे.

मेदनकरवाडी येथील कंपनीच्या अगदी जवळ आली असताना आरोपीने पीडित युवतीला एका इमारतीच्या मागील बाजूस ओढून नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिलेने प्रतिकार केला, आरोपीला चावा ही घेतला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषाच्या मदतीने पीडिताने चाकण पोलिसांना याबाबत कळवले. दरम्यान आरोपीने आपला कबुली जबाब पोलिसांना दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, बलात्कारानंतर त्या रस्त्यावर दोघे जण जात होते, त्यानंतर पीडित युवतीने त्यांना पाहून मोठ्याने आरडाओरडा केला, त्यानंतर तो आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर एका दांपत्याने युवतीला मदत केली, पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने सहा विशेष तपास पथके तयार केली. पोलिसांनी हद्दीतील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला अटक केली आहे.

चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पीडित युवतीला तातडीने उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले. दोघांचा यापूर्वीचा कोणताही परिचय नव्हता. दोघे एकमेकांना ओळखत नव्हते, दोघांच्या कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत. ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला, सर्व पथकांनी 18 ते 19 तास तपास करून तांत्रिक बाबीचा आधार घेत आरोपीचा शोध घेतला, अटकेपासून वाचण्यासाठी तो लपून बसलेला होता, मात्र, स्थानिक माहितीच्या आणि तांत्रिक बाबींच्या आधारे त्याला अटक घेण्यात यश आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली.

आरोपी अविवाहित असून, तो एका कंपनीत कामगार आहे. घटना घडली तेव्हा तो दारू प्यायलेला होता. ‘रस्त्याने जाताना महिला दिसली आणि मी तिला ओढत बाजूला नेत तिच्यावर बलात्कार केला,’ असा कबुलीजबाब आरोपीने दिलेला आहे. पीडितेवर अत्याचार होत असतानाच तिच्यापासून काही अंतरावर काही जण शतपावली करत होते. पीडितेने त्यांना पाहिल्यानंतर मदतीसाठी मोठ्याने आरडाओरडा केला. मात्र, पीडितेचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे पीडितेला कोणाची मदत मिळाली नाही.

पुणे जिल्हा हादरला! नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग…

पुणे जिल्ह्यातील युवती अन् नांदेडमधील युवक; शरीरसंबंधानंतर युवतीला सोडून पळाला…

प्रियकरासोबत आयटी युवतीचे ब्रेकअप अन् पुन्हा तो म्हणू लागला…

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

पुणे! पिंपरी-चिंचवडमध्ये युवतीची सपासप वार करून भररस्त्यात परप्रांतीयांनी केला खून…

पुणे! दाजीने केला घटस्फोटित मेव्हणीच्या प्रेमाला विरोध अन् नको ते घडलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!