सुनील केदार यांचे जंगी स्वागत करणाऱ्या 100 जणांवर गुन्हा दाखल…

नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेल्या सुनील केदार यांची बुधवारी (ता. १०) जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले. या प्रकरणी नागपूरमधील धंतोली पोलीस स्टेशनमध्ये १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सुनील केदार यांची सुटका झाल्यानंतर रॅली काढू नये, असे पोलिसांनी सांगितले होते. शिवाय, या रॅलीला परवानगी न घेतल्याने आता कारवाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एनडीसीसी बंद घोटाळ्यात झालेल्या 5 वर्षाच्या शिक्षेप्रकरणी सुनील केदार यांना जमीन मंजूर केला होता. तुरुंगातून मुक्तता होताच सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांनी तुरुंगाच्या बाहेरून मोठी रॅली काढून राजकीय शक्ती प्रदर्शन केले होते. विनापरवानगी रॅली काढल्याने माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह समर्थकांवर कलम 143,188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, नागपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने सुनील केदार यांना २२ डिसेंबर रोजी बँक घोटाळा प्रकरणी दोषी ठरवले होते. १५२ कोटी रुपयांच्या रोखे घोटाळा प्रकरणी त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सुनील केदार यांच्या जामिनासाठी केलेला अर्ज आणि शिक्षेला स्थगितीची मागणी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळली होती. यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे त्यांनी धाव घेतली होती. अखेर बुधवारी त्यांना एक लाख रुपयांच्या जात-मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणे आणि ढकलणे हा विनयभंग नाही…

महिला कैदी बनली रेडीओ जॉकी! कारागृहात होणार महिला कैद्यांचे मनोरंजन…

बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून चाकूने सपासप वार करून हत्या…

Video: गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस उपायुक्तांना धक्काबुक्की…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!