वैष्णवी हगवणे प्रकरण! निलेश चव्हणला नेपाळमधून अटक; प्रवास पाहा…

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या बाळाला ताब्यात ठेवणाऱ्या निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 10 दिवसांनंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

आरोपी निलेश चव्हाण यांच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढण्यात आले होते. अखेर निलेश चव्हाणच्या नेपाळमधून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपी निलेश चव्हाण हा गेल्या 10 दिवसांपासून फरार होता. निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत होते. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांना निलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात यश आले आहे.

निलेश चव्हाण हा पुणे, दिल्ली, गोरखपूरमार्गे नेपाळला पोहचला. त्याला तिथपर्यंत पोहचण्यासाठी कोणी कोणी मदत केली याचा तपास करण्यात येणार आहे. नेपाळमधून निलेश चव्हाणला विमानाने पुण्यात आणणार आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये निलेश चव्हाण हा एका बसमधून फरार झाला होता. निलेश चव्हण पुण्याहून कर्जत, मुंबई, मध्यप्रेदश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गोरखपूर असा प्रवास करत त्याने नेपाळबॉर्डर गाठली आहे. त्याने बायरोड प्रवास केला असून सतत वाहन तो बदलत होता. निलेश चव्हाण पुण्याहून कारने दिल्लीला गेला. तिथून दुसऱ्या कारने गोरखपूरला गेला. गोरखपूरमधून तो नेपाळमधल्या भैरवा जिल्ह्यातल्या एका गावात गेला. त्या गावात तो लॉजमध्ये लपून बसला होता. नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसांत गुन्हा आहे. तो 21 मे पासून फरार होता. अखेर 10 दिवसानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

वैष्णवी हगवणे हिचे बाळ ताब्यात ठेऊन ते परत देण्याच्या वेळी निलेश चव्हाण याने पिस्तूलांने कस्पटे कुटूंबियांना धाक दाखवला होता. निलेश चव्हाण हा शशांक हगवणे आणि करिश्मा हगवणेचा मित्र आहे. या निलेश चव्हाण वरही पत्नीच्या छळाचा आरोप आहे. त्याच्या पत्नीने ही त्याच्या विरोधात वारजे पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार जून 2022 मध्ये केली होती. हिंजवडी आणि तळेगाव पोलिस ठाण्यात ही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. असे असताना ही त्याला नोव्हेंबर 2022 मध्ये पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिला. हा परवाना देताना त्यावर सही अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांची आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…

हगवणे कुटुंबियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तुल दाखवले अन् म्हणाले…

मोठी बातमी! कारागृहाचे महानिरिक्षक IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर मोठी कारवाई…

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत…

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! काळी जादू, अश्लील व्हिडीओ अन् पत्नीचा छळ…

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले…

राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…

राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…

पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…

पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…

पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!